

Maharashtra Public Relief Society news : महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू नागरिकांना मदतीसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, वैद्यकीय संशोधनासाठी मदत आदी कारणांसाठी सरकार निधी गोळा करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. या सोसायटीला सर्वसामान्य नागिरक, औद्योगिक कंपन्यांसह विविध संस्था, संघटना देणग्या देऊ शकतात. त्याचप्रमाणे परदेशी देणग्याही स्वीकारल्या जाणार आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि गंभीर व खर्चिक आजारांनी ग्रस्त रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी अर्थसहाय्य करणे, नैसर्गिक आपत्तीमधील आपदग्रस्तांना मदत, सामुदायिक आरोग्य शिबीरे राबवविणे, वैद्यकीय संशोधनासाठी मदत आदी कारणांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी च्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी सोसायटीच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री हे सोसायटीचे अध्यक्ष असतील. तर मुख्यमंत्री सचिवालयामध्ये सोसायटीचे कार्यालय असेल. मुख्य सचिवांसह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी या सोसायटीचे अध्यक्ष असणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या दोन सदस्यांचाही सोसायटीच्या नियामक मंडळात समावेश केला जाणार आहे.
या कारणांसाठी केली जाणार मदत :
- नैसर्गिक आपत्ती आणि संकटांमुळे बाधित झालेल्यांना मदत
- हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, मेंदू किंवा मणक्याचे विकार तसेच इतर गंभीर व जीवघेण्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी अंशतः आर्थिक मदत.
- कोणत्याही शासकीय योजनेत समावेश नसलेल्या अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत.
- जातीय दंगलीतील पीडितांना मदत
- नक्षलवादी हल्ल्यांतील पीडितांच्या कुटुंबीयांना मदत
- दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत संस्थांना मदत
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या व्यक्तींना आर्थिक किंवा वस्तुरूप मदत देणे. यामध्ये कपडे, भोजन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे यांचा समावेश.
- आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत जनजागृती.
- समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.