Eknath Shinde Twitter hack : एकनाथ शिंदेंच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर तुर्की अन् पाकिस्तानचे व्हिडिओ दिसल्याने खळबळ, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Eknath Shinde Twitter Hacked : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॅक झालेल्या अकाऊंटवर तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग दिसत आहे.
Eknath Shinde’s official Twitter account was hacked
Eknath Shinde’s official Twitter account was hacked, showing Turkey and Pakistan-related videos. The cyber attack created a political stir in Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Twitter Hacked : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॅक झालेल्या अकाऊंटवर तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग दिसत आहे.

त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून हे अकाऊंट नेमकं कोणी आणि कसं हॅक केलं? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी काही नेत्यांचं देखील या पद्धतीने ट्विटर अकाउंट हॅक झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

मात्र, आता थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं अकाउंट हॅक केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचं समजताच एकनाथ शिंदेंच्या टीमने तात्काळ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे तक्रार दाखल केल्यानंतर आता ते रिकव्हर करण्यात आले आहे.

Eknath Shinde’s official Twitter account was hacked
MSRTC Recruitment 2025 : ST मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! तब्बल 'इतक्या' हजार जागांसाठी मेगाभरती

मात्र, राज्याच्या प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीचे सोशल मीडियाचे खाते असं हॅक होणं ही अत्यंत गंभीर घटना मानली जात आहे. कारण उपमुख्यमंत्र्यांच्या या अधिकृत खात्यावरून अनेक महत्त्वाच्या शासकीय आणि राजकीय माहितीचे प्रसारण केले जाते.

Eknath Shinde’s official Twitter account was hacked
Loan Waiver Farmers : 'त्या' शेतकऱ्यांना द्यावी लागणार कर्जमाफी, हायकोर्टाचा सरकारला दणका!

दरम्यान, थोड्या वेळातच एकनाथ शिंदेंचे एक्स खाते रिकव्हर केले असले तरी ही घटना उच्चस्तरीय सायबर हल्ला आणि राजकीय हस्तक्षेप मानली जात आहे. सायबर पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. सायबर पोलिसांकडून आयपी अॅड्रेस तपासले जात असून हे खाते हॅक करण्यामागे नेमका हेतू काय होता? याचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com