Mahayuti CM New Formula : महाराष्ट्रात मोठा धमाका! एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार,भाजप नेत्यांचं मत बदललं? Video

Mahayuti Politics : दिल्लीतील महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीआधी आणि नंतर घडलेल्या नाराजीनाट्यामुळे मुख्यमंत्री पदाची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित मानले जात असतानाच आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे.
Eknath Shinde-Narendra Modi-Amit shah
Eknath Shinde-Narendra Modi-Amit shahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होते. पण त्यांनी त्या पदावरील दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नाव मुख्यमंत्रि‍पदासाठी सर्वात आघाडीवर आहेत. तसे संकेतही दिल्लीदरबारी अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर दिले जात आहे. पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत नवा ट्विस्ट समोर आला आहे.

दिल्लीतील महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीआधी आणि नंतर घडलेल्या नाराजीनाट्यामुळे मुख्यमंत्री पदाची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित मानले जात असतानाच आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे.तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत नवा फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,महायुतीचा मुख्यमंत्रिपदीचा चेहरा कोण याबाबतचा ठोस निर्णय अद्यापही झाला नसल्यानं सत्तास्थापनेला उशीर होत आहे.पण आता एकीकडे भाजपकडून आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्याचे आदेश दिले असतानाच दिल्लीतील भाजप वरिष्ठ नेतेमंडळी पुन्हा एकदा महाराष्ट्रात धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता आहे.त्यात महायुती सरकारमधील सुरुवातीचे एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होऊ शकतात अशी माहिती समोर आहे. भाजपकडून ही दुजोरा मिळाल्याची माहिती मिळत आहे.

Eknath Shinde-Narendra Modi-Amit shah
Vikram Pachapute : '...तर राजीनामा देऊन पुन्हा आमदारकी लढवेन!'; भाजप आमदार पाचपुतेंना कॉन्फिडन्स, पाहा VIDEO

एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली, मतदारांनी त्यांना कौल दिला आहे.त्यामुळे जनमतांचा अनादर होऊ नये म्हणून भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भूमिका घेतली आहे. विरोधकांनी निकालानंतर ईव्हीएमविरोधात रान पेटवलं आहे. तसंच राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबींचा विचार करता पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

विधानसभेतील यशामुळे एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवली असल्यानं त्यांना मुख्यमंत्री बनवण्यावर शिंदेसेनेतील नेतेमंडळी अजूनही ठाम आहेत. तर भाजपला 130 पेक्षा अधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा,अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे.

Eknath Shinde-Narendra Modi-Amit shah
Maharashtra Politic's : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळगावी; भाजपने उचलले मोठे पाऊल, सर्व आमदारांना मुंबईत केले पाचारण...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन आता उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. याचदरम्यान,महायुतीतील तब्बल 178 आमदारांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यात भाजपचे 132 आमदार आणि पाच अपक्ष तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 अशा 178 आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत, अशी आग्रही मागणी उचलून धरली आ

भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार हे रविवारी (ता. 01 डिसें.) आणि परवा सोमवारी (ता. 02 डिसें.) मुंबईत दाखल होणार आहेत. या सर्व आमदारांची मुंबईत एकत्रित बैठक होणार आहे. भाजप विधिमंडळ गटाची सोमवारी दुपारी बैठक होईल, त्यानंतर सरकार स्थापनेला गती येईल.

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोणाला नेता निवडले जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, मोदी आणि शहा यांची धक्कातंत्राची पद्धत लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे शंभर टक्के सांगणे अवघड आहे. त्यामुळे सोमवारच्या भाजपच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com