Mahayuti Government: महायुती सरकारनं घेतला मीडियाचा मोठा धसका!10 कोटींचा खर्च करुन घेतला 'हा'निर्णय

Media Monitoring Center : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. सरकार संबंधित प्रत्येक बातम्यांवर आता राज्य सरकार कडक लक्ष ठेवणार आहे.
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रचंड बहुमतासह महायुती सरकार सत्तेत आलं आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधी मित्रपक्षांना तर कधी विरोधी पक्षांनाही धक्का देत काही धडाकेबाज निर्णय घेतले. या निर्णयांमुळे कधी विरोधी पक्षांनीही कौतुक केल्याचं दिसून येत आहे.आता यातच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळानं आता 10 कोटी रुपये खर्च करुन महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारसंबंधी ज्या काही सकारात्मक व नकारात्मक बातम्या वृत्तपत्र,डिजिटल आणि चॅनेलवर येतील त्यावर आता वॉच ठेवण्यात येणार आहे. या माध्यमांतून सरकारनं 'मीडिया मॉनिटरिंग'साठीचं एक पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य सरकारच्या (State Government) सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. सरकार संबंधित प्रत्येक बातम्यांवर आता राज्य सरकार कडक लक्ष ठेवणार आहे. यात इलेक्ट्रॉनिक मीडिया,प्रिंट मीडिया,सोशल मीडिया,डिजिटल मीडियावर या वेगवेगळ्या माध्यमांतल्या बातम्यांवर मीडिया मॉनिटरिंग कक्ष व जनसंपर्क संचालनालयाच्या पातळीवर स्वतंत्रपणे काम सुरू राहणार आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Leader Of Opposition: ...तेच राहुल नार्वेकर उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणार? 'विरोधी पक्षनेते'पदाचा निकाल सहजासहजी थोडाच लावणार..?

माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या सरकारशी संबंधित सकारात्मक व नकारात्मक बातम्यांच्या मजकूरांबाबत मॉनिटरिंग सेंटर सरकारला अलर्ट करणार आहे. नकारात्मक माहिती व दिशाभूल करणारा मजकूर त्या त्यावेळी लक्षात आणून देणे, अशाप्रकारच्या गोष्टींवर काम करण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित आहे.

मीडिया मॉनिटरींग सेंटर योजना विस्तारीत स्वरुपात सुरु करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मुद्रित,इलेक्ट्रॉनिक माध्यमे याबरोबरच समाजमाध्यमे, डिजिटल माध्यमे,ऑनलाईन न्यूज वेबसाईटस,न्यूज अॅप्स यासारखी नवमाध्यमे यांचा विचार करण्यात आला आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
harshvardhan sapkal : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा मोठा निर्णय; तापलेल्या बीड जिल्ह्यात करणार पहिल्यांदाच मुक्काम; काय आहे नेमके कारण ?

दुसऱ्या टप्प्यात यापुढील काळात काही अधिक नवमाध्यमे आल्यास याचाही या योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय सकाळी 8 ते रात्री 10 यावेळेत हे सेंटर सुरु राहणार असून वेळोवेळी सरकारशी संबंधित त्या त्या विभागाला अपडेट दिले जाणार आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com