Mahayuti Government Announcement: विरोधकांना घाम फुटणार? महायुती सरकारनं अर्थसंकल्पात केली 'ही' मोठी घोषणा

Maharashtra Budget 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. महायुती सरकारनं केंद्रातील मोदी सरकारच्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्याच्या दिशेनंच एक पाऊल टाकलं आहे.
Mahayuti Government .jpg
Mahayuti Government .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गतिमान सरकार, वेगवान कारभार,वेगवान निर्णय-निर्णय गतिमान,महाराष्ट्र वेगवान गतिमान विकास यांसारख्या टॅगलाईनसह पुन्हा सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प (Budget ) सोमवारी (ता.10) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महिला, कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठी भरघोस तरतुदी केल्या. पण आता महायुती सरकारनं विरोधकांना घाम फोडण्याच्या दृष्टीनं मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. महायुती सरकारनं केंद्रातील मोदी सरकारच्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्याच्या दिशेनंच एक पाऊल टाकलं आहे. एकीकडे महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही,अशी घोषणा करत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केल्या. यातच सरकारनं आता अल्पसंख्याक समाजासाठी मोठी घोषणा करतानाच विविध समाजाच्या 18 महामंडळांच्या सर्वच योजना एकाच वेबसाईटवर आणण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचा 11 वा अर्थंसंकल्प विधानसभेत सादर करताना विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल असा आत्मविश्वासही व्यक्त केला आहे.विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी असंही त्यांनी म्हटलं होतं.

Mahayuti Government .jpg
Amit Shah : 'राम मंदिर झाले आता सीता मातेचे मंदिर उभारणार', अमित शाहांची मोठी घोषणा

काय आहेत मोठी घोषणा..?

अर्थमंत्री अजित पवारांनी यावेळी अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यात त्यांनी बौद्ध, जैन, शीख, पारशी, ख्रिश्चन,यहुदी व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. तसेच अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली असून तिच्यासाठी राज्य सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

अजित पवार म्हणाले,राज्य सरकारकडून धनगर तसेच गोवारी समाजाकरिता आदिवासी उपयोजनेच्या धर्तीवर एकूण 22 कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.राज्यातील मागासवर्गीय व दुर्बल घटकांसाठी निवारा,वीज,पाणी, आरोग्य,शिक्षण,पोषण तसेच रोजगारासाठी योजना राबविण्यात राज्य अग्रेसर असून महायुती सरकार या घटकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कटिबध्द असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Mahayuti Government .jpg
Padalkar On Budget : गोपीचंद पडळकरांची अर्थसंकल्पावर मजेशीर प्रतिक्रिया, ‘नीट बघायला पाहिजे...त्यांनी काय घोषणा केल्या, हे मी नीट ऐकलंच नाही’

तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना सोयीस्कर व्हावं,यासाठी एकूण 18 महामंडळं स्थापन करण्यात आली. पण या महामंडळांच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्याचं नियोजन असल्याचंही पवार म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com