मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणारा महेंद्र भानुशाली पोलिसांच्या ताब्यात

MNS| Raj Thackeray| Masjid | भोंगे काढले नाही तर मस्जिदींवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशाराही राज यांनी दिला होता.
Raj Thackeray
Raj ThackerayTwittwe/@ANI
Published on
Updated on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळाव्यात मस्जिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. भोंगे काढले नाही तर मस्जिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशाराही राज यांनी दिला होता. त्यानंतर आता यावरुन राजकारण पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

त्यानंतर आज मनसेच्या चांदिवली विधानसभा मतदार संघांचे महेंद्र भानुशाली यांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयाबाहेर भोंगे लावत हनुमान चालिसा लावला. चिरागनगर पोलिसांनी (Police) मनसे कार्यकर्त्यांना अगोदर समज दिली. पण पोलिसांनी समज देऊनहीभोंगे न उतरवल्यामुळे अखेर पोलिसांनीच मनसेच्या कार्यालयाबाहेर लावलेले भोंगे उतरवले आणि महेंद्र भानुशाली यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Raj Thackeray
उद्धव ठाकरेंना निवडणुकीचा निकाल लागल्यावर साक्षात्कार कसा झाला? राज कडाडले...

राज ठाकरेंनी शनिवारी गुडीपाडवा मेळाव्यात राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आमुंबईच्या घाटकोपरमधील मनसे कार्यायलयाबाहेरील भोंगे लावले. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेत कार्यालयासमोरील झाडावर लावलेले भोंगे उतरले.

कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भोंगे लावल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान याघटनेवरुन राजकारण तापण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांकडून होत आहे. या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान, काल गुडीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी, माझी पंतप्रधानांना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता आहात ना, पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यातल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल. प्रार्थनेला विरोध नाही, पण मस्जिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. भोंगे काढले नाही तर मस्जिदींवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशाराही राज यांनी दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com