
Mahesh Kothare: मराठीतले प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या एका विधानाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. आपण मोदीभक्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच आगामी महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मागाठणे येथील एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
कार्यक्रमात बोलताना कोठारे म्हणाले, "या सगळ्या कार्यक्रमाला येऊन मला इतका आनंद झालाय कारण आपला हा घरचा कार्यक्रम आहे. भाजप म्हणजे आपलं घर आहे, मी भाजपचा भक्त आहे मी मोदीजींचा भक्त आहे. आता हे कार्यक्रमाचं पंधराव वर्ष आहे, यानंतर जेव्हा आपलं १६व्या वर्षातलं दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. मला आठवतंय आपल्याच परिसरात पियुष गोयल आले होते त्यांच्या प्रचारासाठी मी आलो होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की आपण नुसता एक उमेदवार निवडून देत नाही तर एक मंत्री निवडून देत आहोत. आता या विभागातून नगरसेवक नाही तर महापौर निवडला जाईल"
दरम्यान, याच दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात महेश कोठारेंनी भाजपचा प्रचार देखील केला. त्यांनी म्हटलं की, आपल्याला इथून नगरसेवक आणि महापौरही निवडून द्यायचा आहे. त्यांच्या या विधानावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे, कारण मुंबई महापालिका निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही. पण मुंबईची निवडणूक महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचं खुद्द या तिन्ही पक्षांचे नेते सूचकपणे बोलत आहेत. अद्याप तशी अधिकृत घोषणा आणि प्रचार सुरु झालेला नाही. पण कोठारेंच्या या विधानामुळं भाजपची मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची आणि आपलाच महापौर महापालिकेवर बसवणार असल्याची रणनीती सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
या कार्यक्रमाला महेश कोठारेंसोबत भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडे आदी नेते मंडळीही उपस्थित होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.