किरण गोसावीचा मनसूख हिरेन होण्याची मलिकांनी वाटतेय भीती

अंमली पदार्थ विरोधी विभागाचे (एनसीबी) प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक विषय आहेत.
नवाब मलिक
नवाब मलिक सरकारनामा
Published on
Updated on

मुंबई : आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी इतके दिवस गायब होता. कालपासून तो अचानक समोर आला आहे. ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे एकुण प्रकरण पाहता किरण गोसावीचा मनसूख हिरेन होऊ शकतो, अशी भीती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज व्यक्त केली.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘‘ आर्यन खान प्रकरण उजेडात आल्यापासून गायब झालेला गोसावी प्रभाकर सोइलचा व्हीडीओ समोर आल्यानंतर समोर आला आहे. माध्यमांना फोनवरून मुलाखत देऊ लागला आहे. त्याच्या शोधासाठी पुणे पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र, या साऱ्या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता मोकाशी याचा मनसूख हिरेन प्रमाणे खून होण्याची भीती वाटत आहे.’’

नवाब मलिक
पुण्यातील नगरसेवकांची संख्या जाणार १८३ वर ?

अंमली पदार्थ विरोधी विभागाचे (एनसीबी) प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक विषय आहेत. किती विषय सांगू, असे म्हणत येत्या काळात अनेक गोष्ट समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वानखेडेंचा मी व्टिट केलेला जन्म दाखला खरा आहे. त्यांचे जातप्रमाणपत्रदेखील खोटे असून जात वैधता प्रमाणपत्र समितीसमोर ते मांडण्यात येईल. जन्म दाखल्यावर खाडाखोड करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट होईल, असे मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक
पटोलेंचा इशारा; आता नुरा कुस्ती चालणार नाही

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे असे नाव सांगत असले तरी त्यांनी धर्म बदलल्यानंतर ते दाऊद खान झाले होते. त्याचा पुरावा शोधण्याचे काम सरू असून तेदेखील आम्ही समोर आणू, असे मलिक यांनी सांगितले. समीर यांच्या वडिलांनी धर्म बदलून त्याचा दुहेरी फायदा घेतला. नोकरी केली आणि सरकारकडून पेन्शनही घेतल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.माझी पाहिती खोटी आहे, असे वानखेडे यांना खोटे वाटत असेल तर ते माझ्याविरोधात दावा दाखल करू शकतात, असे मलिक यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com