Kalyan News : काका-पुतणे मैदानात! आदित्य अन् राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर

Aaditya Thackeray And Raj Thackeray : आदित्य अन् राज ठाकरेंच्या दौऱ्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
aaditya thackeray raj thackeray
aaditya thackeray raj thackeraysarkarnama
Published on
Updated on

भाजप आमदार गणपत गायकवाड ( Ganpat Gaikwad ) यांनी शिवसेना शिंदे गटातील शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. यानंतर सगळ्या राज्याचं लक्ष कल्याणकडं लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी ( 8 फेब्रुवारी ) कल्याण दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील गुरुवारी कल्याण दौऱ्यावर आहेत.

aaditya thackeray raj thackeray
Ganpat Gaikwad Firing : गोळीबार प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला अटक, दोघेजण फरार

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे ( Kalyan Loksabha 2024 ) सगळ्यांचं लक्ष आहे. त्यासाठी जागांची चाचपणी करण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच कल्याण दौऱ्यावर गुरुवारी ठाकरे काका-पुतणे जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार केला होता. त्यानंतर कल्याण मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपमधील वाद पुन्हा समोर आला. अशातच कल्याण मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) जाणार आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्यासाठीच हे दौरे महत्त्वाचे होत.

aaditya thackeray raj thackeray
Nagar News : विखेंच्या बालेकिल्ल्यात 'भावी मुख्यमंत्री' म्हणून थोरातांचे बॅनर; भाजप नेते झळकले

आदित्य ठाकरे एकदिवसीय दौऱ्यावर

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी कल्याण दौरा करणार आहेत. त्यांचा हा एकदिवसीय दौरा असणार आहेत. कल्याणमधील सर्व ठाकरे गटाच्या शाखांना आदित्य ठाकरे भेट देणार आहेत. आदित्य ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत.

aaditya thackeray raj thackeray
Dharashiv Loksabha 2024 : काका मला खासदार करा, पुतण्याची इच्छा तानाजी सावंत पूर्ण करणार?

महाराष्ट्राचा यूपी-बिहार होऊ न देण्याच्या उद्देशानं राज ठाकरेंचा दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोनदिवसीय कल्याण दौऱ्यावर असणार आहेत. गुरुवारी ते कल्याणमध्ये जात आढावा घेणार आहेत. शुक्रवारी ( 9 फेब्रुवारी ) राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्राचा यूपी-बिहार होऊ देऊ नका, हा उद्देश घेऊन राज ठाकरे दौरा करणार आहेत. शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत गायकवाड प्रकरणावर भाष्य करण्याची शक्यता आहे.

( Edited By : Akshay Sabale )

aaditya thackeray raj thackeray
Kalyan Dombivli : आयुक्त दालनाबाहेर राडा! पालिका कर्मचाऱ्यास सुरक्षारक्षकांनी केली मारहाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com