Ajit Pawar On Kokate: अजितदादांनी गेम फिरवला; माणिकराव कोकाटेंवरचं कृषिखातं जाणार पण मंत्रिपद कायम राहणार ?

Mahayuti Government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात आज सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक झाली आणि याच बैठकीत माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Manikrao Kokate News .jpg
Manikrao Kokate News .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: पावसाळी सभागृहात मोबाइलवर रमी गेम खेळत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ आणि वादग्रस्त विधानांचा धडाका यामुळे राजीनामा देण्याची वेळ आलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चांगलेच अडचणीत आले होते. त्यानंतर त्यांनी शनिदेवांना तेलाचा अभिषेक करत पूजाही केली होती. यानंतर आता कोकाटेंबाबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटली होती. या भेटीत महायुतीतील वादग्रस्त मंत्र्यां वरुन शहा या संतापल्याचे समोर आले होते.यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माणिकराव कोकाटेंना कितीवेळा माफ करणार असं स्पष्ट भूमिका घेत मोठ्या निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा न घेता त्यांना तंबी दिल्याची माहितीही समोर आली होती. पण यानंतर गुरुवारी(ता.31) राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा वेग पकडला. अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोकाटेंना तूर्त अभय देताना त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडचं कृषिखातं काढून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री होण्याची शक्यता आहे.तसेच त्यांच्याकडील क्रीडा खातं माणिकराव कोकाटेंना दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Manikrao Kokate News .jpg
Maharashtra Politics: 'भाजपसोबत युती सर्वात मोठी चूक!'; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला हजेरी लावलेल्या नेत्याचं मोठं विधान

काही दिवसांपूर्वीच मंत्री माणिकराव कोकाटेंनी नंदूरबार जिल्ह्यातलं शनिमांडव येथील शनी मंदिरात दर्शन घेऊन विधीवत पूजा केली. गेल्या काही दिवसांपासून वेगेगवेगळ्या आरोपांमुळे अडचणीत आलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिमांडव येथील शनी मंदिरात दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

यावेळी त्यांनी साडेसाती सोडवणाऱ्या शनिमांडव गावच्या शनिदेवा तुला अभिषेक करतोय.. साडेसाती सुटूदे.. दुष्टचक्र हटू दे.. विघ्न दूर होऊ दे.. असा धावा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी शनिदेवाचरणी केला. यानंतर आता कोकाटेंना अजित पवारांसह महायुती सरकारकडून अभय दिले गेले असल्याची चर्चा आहे. हा कोकाटेंनी शनि मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तिथे त्यांनी शनिदेवांना तैलाभिषेकही केला होता. त्याचाच हा परिणाम तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Manikrao Kokate News .jpg
Rohini Salian News : ‘मालेगाव’वर तत्कालीन सरकारी वकिलांचे धक्कादायक विधान; म्हणाल्या, खूप पुरावे सादर केले होते, ते कुठे गायब झाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात आज सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक झाली आणि याच बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, दुसरीकडे या कृषिखात्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील उत्सुक आहेत. अजितदादांनी धनंजय मुंडे यांच्याही मंत्रिमंडळातील कमबॅकचे संकेत दिले होते. याचदरम्यान,मुंडेंनी पुन्हा एकदा कृषिखातं मिळावं यासाठी मुख्यमंत्र्‍यांची दोनदा भेट घेत लॉबिंग केल्याची माहितीही समोर आली होती. त्यासाठी त्यांच्याकडून लॉबिंग सुरू असल्याचं समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com