
मुंबईहून (Mumbai) गोव्याला (Goa) जाणाऱ्या एका क्रुझ शिपवर शनिवारी (२ ऑक्टोबर) नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या ( NCB) पथकाने छापा टाकला. त्यात १० जणांना एनसीबीने ताब्यात घेतल आणि त्यातील ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या चार दिवसात या प्रकरणात मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. मात्र आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते नबाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला.
“एनसीबीने केलेल्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला जाताना दिसत आहेत. त्या व्यक्तीच नाव मनीष भानूशाली असे आहे. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचा अरोप नबाव मलिकांनी केला आहे. मनीष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात असल्याचे दिसत आहे.भानुशालीच्या प्रोफाईलवर भाजप उपाध्यक्ष असा उल्लेख दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यासह काही भाजप नेत्यांबरोबर फोटो दिसत आहेत. मग आता या कारवाईत मनीष भानुशालीचा काय संबंध आहे हे एनसीबीने सांगाव, असा प्रश्न मलिकांनी विचारला.
या गौप्यस्फोटानंतर आता, मनीष भानूशालीने सामला दिलेल्या मुलाखतीत या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ''क्रुझशिपवरील ड्रग्ज पार्टीची माहिती मला माझ्या माझ्या मित्रांकडून मिळाली ती फक्त मी एनसीबीला दिली. मला मिळालेल्या माहितीच्या आधारावर एनसीबीने ही कारवाई केली. एनसीबीचे अधिकारी मला घेऊन गेले होते. ज्या लोकांना पकडून आणलं गेलं त्यांच्या तोंडावर मास्क होतं, त्यामुळे मी ज्या गाडीत आलो त्या गाडीत कोण होतं ते मला ठाऊक नाही. मी देशसेवेचं काम केलं. पण आता मला शिवसेना, राष्ट्रवादी वाल्यांचे फोन, मेसेजेस येत आहेत. माझ्यावर दबाव टाकला जात आहे. पण जर मी काही गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे.'' असही भानुशाली यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी कडून माझ्या जीवाला धोका आहे. मला संरक्षण मिळावे,अशी विनंतीही मनीष भानूशालीने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.