Maratha Reservation : जरांगे-पाटलांना मोठा धक्का, आझाद मैदानावर परवानगी नाकारली

Manoj Jarange Patil : मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी परवानगी नाकारली
Azad Maidan, Jarange Patil
Azad Maidan, Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News :

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे-पाटील यांना आझाद मैदानावर परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करणार होते. पण मुंबई पोलिसांनी त्यांच्या आंदोलनासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनससमोरील आझाद मैदानात परवानगी देण्यास नकार दिला आहे. हा जरांगे-पाटील यांना मोठा धक्का मानला जातो.

Azad Maidan, Jarange Patil
Manoj Jarange Speech : शरीर साथ देईना, पाय सुजले, वात आला... ; जरांगेंच्या भाषणाने जनसमुदाय भावूक!

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांची अंतरवाली सराटीमधून पदयात्रा सुरू झाली आहे. ही पदयात्रा २० जानेवारीपासून सुरू झाली असून आज संध्याकाळी मराठा पदयात्रा लोणावळ्यातून नवी मुंबईत मुक्कामी येणार आहे.

या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे काल तातडीची सुनावणी झाली. त्यावर जरांगेंच्या वतीने आझाद मैदानासाठी कुठलाही अर्ज आलेला नसल्याने सरकारी पक्षाने स्पष्ट केले. आता यावर १४ फेब्रवारी रोजी सुनावणी होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोटीस पाठवली आहे. मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडणार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी या नोटिसीत केला आहे. शिवाय ज्या संख्येने मराठा आरक्षणाचे आंदोलक मुंबईत येणार आहेत त्यांना सामावून घेईल एवढ्या क्षमतेचे मैदान मुंबईत नाही. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी मुंबईऐवजी नवी मुंबईतील खारघरमधील मैदानात आंदोलन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

मुंबई पोलिसांनी जरांगे-पाटलांना आझाद मैदान नाकारले असले तरी आझाद मैदानावर आंदोलनासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता पोलिस कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Azad Maidan, Jarange Patil
Maratha Reservation : हायकोर्टाच्या नोटीसला मनोज जरांगेंचे उत्तर, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com