Uddhav Thackeray On Resevation
Uddhav Thackeray On ResevationSarkarnama

Maratha Resevation Bill : जरांगेंना जी शंका तीच उद्धव ठाकरेंना; म्हणाले,'मराठा समाजाने...'

Uddhav Thackeray On Maratha Reservation Bill : याचा विचार मराठा समाजाने करायचा आहे.
Published on

Mumbai News : राज्याच्या विधिमंडळात विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेले मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले आहे. शिंदे यांनी विधेयक सादर केल्यानंतर सरकार या आरक्षणासाठी कटिबद्ध आहे, असे स्पष्ट केले आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंका व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात येऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray On Resevation
Maratha Reservation : मराठा आरक्षण टिकेल याची शाश्वती आहे का ? 'सगेसोयरे' अध्यादेशाचे काय ? 'मविआ'चा सरकारला सवाल

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आरक्षण विधेयक मंजूर केले आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील यांना हा संशय आहे, की या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे का? याचा विचार मराठा समाजाने करायचा आहे. याबद्दल मी आता फार काही बोलू शकत नाही, असे ठाकरे म्हणाले.

बहुमताने नाही एकमताने -

दरम्यान, मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर अध्यक्षांनी हे बहुमताने मंजूर झाल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधक तसेच भुजबळांचीही मंजुरी असल्याचे सांगून हे विधेयक एकमताने मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर अध्यक्षांनी मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले.

Uddhav Thackeray On Resevation
Maratha Reservation : मोठी बातमी ! मराठा आरक्षण विधेयक मंजूर; पण तरीही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण द्या, ही आमची पूर्वीपासूनची भूमिका होती. आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com