Mumbai News: राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची दिलेली डेडलाईन दोन दिवसांत संपत आहे. असे असतानाच जरांगे-पाटलांनी नवी मागणी केली आहे. आई कुणबी असल्यास मुलाला देखील कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या जरांगे-पाटील त्यांच्या वक्तव्यावरून मतभेद सुरू झाले आहेत. त्यामुळे सरकारची आणखी कोंडी होण्याची शक्यता आहे. आता याच विषयांवरून छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर उपरोधक टीका केली आहे.
'जरांगेचं म्हणणं सरकारनं ऐकलं पाहिजे. जे सोयरे आहेत, पत्नीचे आईवडील, त्यांची मुलं, व्याह्यांचे व्याही... त्या व्याह्यांचे व्याही... अशी जी सर्व साखळी आहे त्या सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे. आपण जरांगेचं ऐकलं पाहिजे, नाही तर ते मोर्चा घेऊन येतात' , असे म्हणत भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जरांगेंना खोचक टोला लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटण्यासाठी जाते, यावरून भुजबळांनी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. 'मंत्री सारखे सारखे तिकडे जातात, त्यापेक्षा दोन-चार बंगले, चीफ सेक्रेटरीचं कार्यालय तिथे उभारा म्हणजे त्यांनी सांगितलं की लगेच जीआर काढता येईल. जाण्यायेण्याचा त्रास वाचेल. जरांगेंच्या मनात अभिनव कल्पना येत असतात. मग मंत्री जातात, त्यापेक्षा आपलेच मंत्री तिथे गेले तर बरं होईल', असा टोला भुजबळांनी लगावला.
'मराठा आरक्षणावरून जरांगे-पाटील सरकारला वेठीस धरत नाहीत, तर उलट सरकारच जरांगेंना वेठीस धरत आहे. जरांगे यांना देव सुद्ध घाबरतात, त्यांचं काहीच चूक नाही, जिथं देवाची देखील पर्वा नाही तिथं सरकार काय चीज आहे. त्यामुळे जरांगे म्हणतील तसा जीआर सरकारने काढला पाहिजे. नवीन-नवीन कल्पना त्यांच्या डोक्यात येतात त्याचा आदर करायला पाहिजे', असे भुजबळ म्हणाले.
'पुढच्या मेळाव्यात मी जरांगे यांच्या बाजूने भाषण करेल. होय मी 'यू टर्न' घेतला आहे. आम्ही अजिबात नाराज नाही. मी जरांगेबाबत केलेली सर्व वक्तव्य मागे घेतो. त्यांच्या अभिनव कल्पना बरोबर आहेत. जरांगेंनी सरकारला वेठीस धरलं नाही तर सरकारने जरांगेला वेठीस धरलं आहे", असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर उपरोधक टीका केली.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.