Maratha Reservation GR : 'सगेसोयरे' शब्दावर तोडगा पण 'जीआर'मध्ये नेमकं काय?

Manoj Jarange Mumbai Morcha : सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल. असा स्पष्ट उल्लेख जीआरमध्ये आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार त्यांना सुधारीत जीआर देखील राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. 'सगेसोयरे' या शब्दावरून मनोज जरांगे पाटील माघार घेण्यास तयार नव्हते. त्या 'सगेसोयरे'मध्ये कोण असेल याचा उल्लेख जीआरमध्ये आहे.

सगेसोयरे म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल. असा स्पष्ट उल्लेख जीआरमध्ये (GR) करण्यात आला आहे. Maratha Reservation GR

Maratha Reservation
Manoj Jarange on Maratha Reservation : 21 व्या शतकातील पानिपतचा यशस्वी लढा; मराठा आंदोलकांची भावना !

शपथपत्राद्वारे प्रमाणपत्र

सगेसोयरेची व्याख्या करताना त्यामध्ये सरकारकडून तरतूद देखील केली आहे. या तरतुदीनुसार कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील नातेवाईक, असे अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र...

ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत, याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना नोंदीचा आधार घेऊनच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील. मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. तसेच लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत. सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे देखील जीआर मध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com