Maratha Reservation Court : मराठा आंदोलकांना कोर्टानेच केलं कंट्रोल; 24 तासांत रस्ते, रेल्वे स्टेशन्स रिकामे करा, येणाऱ्यांनाही ठाण्यातच थांबवा!

Maratha Reservation Court Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन बेकायदेशीर असल्याची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. त्यावरील सुनावणी करताना आंदोलन हाताबाहेर गेल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.
Maratha Reservation Court
Maratha Reservation Courtsarkarnama
Published on
Updated on

Mumbai Court : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात .गुणरत्न सदावर्ते हे मुंबई हायकोर्टात गेले आहेत. त्यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान, महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी जरांगे पाटील यांनी आंदोलासाठी दिलेल्या हमी पत्राचे उल्लंघन केल्याचे सांगितले.

या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने मोठा निर्णय घेत म्हटले की, मुंबईबाहेरून आता आंदोलकांना येऊ देऊ नका. त्यांना ठाण्यातच थांबवा. आंदोलकांना आम्ही स्थिती पूर्वपदावर आण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देत आहोत.

कोर्टाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की, आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही पण अटी शर्तींचे पालन व्हावे. आंदोलन हाताबाहेर गेलं आहे. तुम्ही रस्ते आडवून मुंबई थांबवू शकत नाहीत. उद्या शाळा, काॅलेज देखील बाधित होतील. मुंबईतील साहित्य बाहेर जाताना अडचण यायला नको. सीएसएमटी, मरिन ड्राईव्ह, दक्षिण मुंबईतील आंदोलकांना हटवा, उद्या दुपारी चारपर्यंत रस्ते मोकळे करा तसेच आझाद मैदान सोडून इतर रस्ते, जागा मोकळ्या रिकाम्या करा, असे निर्देश देखील कोर्टाने दिले आहेत.

कोर्टाने नियमांच्या आधीन राहून परवानगी दिली. वृत्तपत्राचे बातम्यांची गंभीर दखल घेत आहोत, असे कोर्टाने सांगितले. कोर्टाने जबाबदारी पार पाडली सरकारने अंमलबजावणी करावी, असे कोर्टाने म्हटले. कोर्टाने निर्णय घ्यावा आम्ही लगेच कारवाई करू, असे महाअधिवक्त्यांनी सांगितले. रस्त्यावर लोक उतरले तर तुम्ही ते लगेच खाली का नाही केले असा सवाल कोर्टाने महाअधिवक्त्यांना केला. त्यावर आम्ही प्रयत्न केला, असे महाअधिवक्त्यांनी सांगितले.

Maratha Reservation Court
Sharad Pawar Nashik: नाशिक असेल रणांगण ! शरद पवार फुंकणार निवडणुकीचं रणशिंग, दोन दिवसाचं नियोजन

सदावर्ते यांनी हायकोर्टात सांगितले की, केवळ आझाद मैदानात परवानगी असताना इतर परिसरात आंदोलन केले जात आहे. आंदोलकांकडून रस्ता रोके केले जात आहे. या आंदोलामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो आहे. अगदी कोर्टाच्या आजुबाजुला देखील आंदोलक असल्याचे त्यांनी म्हटले.

सीएसएमटीच्या गर्दीचे व्हिडिओ सदावर्ते यांनी कोर्टात दाखवले तसेच आंदोलकांकडून वाहनचालकाची वाहन आडवून त्यांना लायसन्सची विचारणार करत असल्याची माहिती दिली. तसेच जरांगेच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे, शरद पवार रसद पुरवत असल्याचे देखील म्हटले.

प्लॅन करून मुंबईत आले

मनोज जरांगेच्या आंदोलनाला परवानगी सरकारकडून वाढवून दिली नाही. मनोज जरांगे आणि विरेंद्र पाटलांकडून नियमांचे उल्लंघन केले. आंदोलक प्लॅन करून गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आले, असे महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी कोर्टात सांगितले.

Maratha Reservation Court
Gunaratna Sadavarte : इकडे आंदोलन तिकडे पोलिस बंदोबस्तात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात पोहोचले, केली मोठी मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com