
Mumbai News, 06 Aug : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. तर यावेळी त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईत येणार आहेत.
मात्र, त्यांनी मुंबईत येण्यापूर्वीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय फडणवीसांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबतही त्यांनी मोठा दावा केला.
अंतरवाली सराटी येथे पोलिसांकडून झालेली मारहाण ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच झाली होती, असा गंभीर आरोप जरांगें पाटलांनी केला आहे. शिवाय फडणवीसांनी आदेश दिले नसते तर पोलिसांची हिंमत नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील मुंबईत येण्याआधीच त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवाय सरकारने मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नये. एकदा मुंबईच्या दिशेने निघालो तर अजिबात माघार घेणार नाही, असा इशाराही त्यांनी महायुती सरकारला दिला आहे. तर पहिल्या आरक्षण लढ्यात निघालेला जीआर योग्य असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीत आमची फसवणूक झाली.
मी चर्चेच्या प्रक्रियेत गेलो नसलो तरी मात्र चर्चा करायची नाही असे मी म्हटलं नव्हतं, असही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अंतरवलीत झालेली चूक पुन्हा करू नका, देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, गोडी गुलाबीने जे करायचं ते करायचं.
त्यावेळेस घडलं ते घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. ही धमकी नाही तुम्हाला समजावून सांगतो, कारण तुम्हाला ती खोड आहे. काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल, असा इशाराच जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.