Manoj Jarange Hunger Strike : जरांगेंच्या मागणीला तुमचं समर्थन आहे का?; शरद पवार, उद्धव ठाकरेंना शंभूराज देसाईंचा थेट सवाल

Maratha Reservation Update : मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. आणि राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे.
maratha reservation news
maratha reservation newsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि ठाकरे गटाकडून अनिल परब उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

maratha reservation news
Maratha Andolan : 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत मुंबईत आमदार निवासाबाहेर वाहनांची तोडफोड; दोघे पोलिसांच्या ताब्यात

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसंच विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारने मराठा सरकसट कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा करावी, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीवर तुमची काय भूमिका आहे? हे स्पष्ट करा, असं शंभूराज देसाई म्हणाले.

'मनोज जरांगेंच्या मागणीला पाठिंबा आहे का?'

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षांनी मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलं पाहिजे. तसंच संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आता जरांगे पाटील यांच्या या मागणीवर सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं जरांगेंच्या मागणीला समर्थन आहे का? तुमच्या पक्षाला हे मान्य आहे का? त्यामुळे या सर्व नेत्यांनी आपलं मत राज्यातील जनतेसमोर मांडावं. यामुळे कुठल्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? हे राज्यातील जनतेलाही कळेल, असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

maratha reservation news
Manoj Jarange Patil Uposhan : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आंदोलन उधळण्याचा डाव; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे. दुसरीकडे मंत्रालयाबाहेर मराठा समाजाच्या आमदारांनी आंदोलन सुरू केलं आहे. २५ हून अधिक आमदारांनी आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं असून, मंत्रालयाला टाळं लावलं आहे. एक मराठा, लाख मराठा... अशा घोषणा दिल्या जात आहेत.

maratha reservation news
Hasan Mushrif News : मुश्रीफांच्या गाडीच्या तोडफोडीनंतर कोल्हापूर पोलिस अलर्टवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com