Manoj Jarange Patil Morcha: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; जरांगे पाटील अन् शिष्टमंडळाची उद्या बैठक

Maratha Reservation : राज्य सरकारचे तीन सदस्यांचे शिष्टमंडळ जरांगे-पाटील यांची भेट घेणार आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मनोज जरांगे-पाटील यांची मराठा आरक्षणासाठीची पदयात्रा सध्या खंडाळ्याच्या पुढे आहे. हा मोर्चा आज रात्री वाशीला पोहोचणार असून त्यानंतर हा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने जाईल. मात्र, त्याआधीच जरांगे-पाटील यांची भेट घेण्यासाठी सरकारचे तीन सदस्यांचे शिष्टमंडळ रवाना झाले आहे.

सरकारचे हे शिष्टमंडळ आज गुरुवारी रात्री जरांगे-पाटील यांची भेट घेण्याची शक्यता होती. मात्र, आज भेट घेणार नसून शुक्रवारी सकाळी सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे-पाटील यांच्यात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बरोबरच या शिष्टमंडळाकडे तीन नवे जीआर आणि राजपत्र असल्याचे सांगण्यात येत आहे. (Manoj Jarange Patil Morcha)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Maratha Reservation Breaking News : जरांगेंच्या मागण्या मान्य? 3 जीआर घेऊन सरकारचं शिष्टमंडळ निघालं, पण...

या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, ओएसडी मंगेश चिवटे आणि सरकारी अधिकारी सुनील अवताडे यांचा समावेश असणार आहे. या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर जरांगे-पाटील काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसेच जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. त्यांच्या आंदोलनाला मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी परवानगी अद्याप दिलेली नाही. तर मनोज जरांगे हे आझाद मैदानावर जाण्यास ठाम आहेत. मात्र, जरांगे-पाटील यांच्यासोबत असलेल्या आंदोलकांची संख्या पाहता आझाद मैदान अपुरे असल्यामुळे मुंबई पोलिसांनी जरांगे-पाटील यांना दुसरे मैदान सुचवले आहे.

तसेच मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईच्या (Mumbai) वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी येणाऱ्या सरकारच्या शिष्टमंडळाकडे नेमकं कोणत्या मागण्यांचे जीआर आहेत, तसेच या नव्या जीआरमध्ये नेमकं काय आहे ? हे उद्याच स्पष्ट होणार आहे. तसेच राज्य सरकार जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य करणार का? हे देखील पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मनोज जरांगे लाखो मराठा बांधवांसह मुंबईत तर येताय, मात्र मुक्काम कुठे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com