Maratha Reservation Court : मनोज जरांगेंच्या मागणीपुढे कोर्टाच्या निर्णयाचा पेच, सरकार काय करणार?

Maratha Reservation Kunbi Certificates : मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून बाहेर पडणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सरसकट कुणबी प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे कोंडी होण्याची शक्यता आहे.
Maratha Reservation Court
Maratha Reservation Courtsarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, सरसकट कुणबी दाखले द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारपुढे मोठा पेच उभा राहिला आहे.

सरसकट कुणबी दाखल देण्याच्या मागणीवर देखील सरकार कोडींत सापडले आहे. सुप्रीम कोर्टा आणि हायकोर्ट यांनी सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि बाळासाहेब रंगनाथ चव्हाण विरुद्ध जगन्नाथ होले अशा काही प्रकरणांमध्ये केवळ मराठा म्हणून नोंद असलेल्याला सरसकट कुणबी म्हणता येणार नाही, असे जजमेंट दिले होते.

'सरसकट कुणबी'च्या कोर्टाने आधीच्या प्रकरणांमध्ये दिलेल्या निर्णयामुळे यातून कसा मार्ग काढायचा असा प्रश्न सरकार आणि मराठा उपसमितीला पडलेला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी मराठा उपसमितीला भेटण्याची वेळ दिली आहे. त्यामुळे या भेटीत या विषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation Court
Maratha Reservation News : मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनात मराठवाड्यातील आणखी एका तरुणाचा मृत्यू!

ओबीसीतून आरक्षण नाही?

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला वेढीस धरु नये असे म्हटले होते. तसेच त्यांच्या आरक्षणाची मागणी ही राजकीय आरक्षणासाठी असल्याचा देखील सांगितले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नसल्याविषयी देखील त्यांनी सांगितले. तसेच जो पूर्ण होणार नाही तो हट्ट धरू नये, असे देखील जरांगेंना उद्देशून आवाहन केले होते.

Maratha Reservation Court
Manoj Jarange's Agitation : भाजपच्या बड्या नेत्याचा मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; म्हणाले ‘ही तर राजकीय आरक्षणासाठी धडपड...’ (Video)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com