Shivsena Rajya Sabha: 'मातोश्री'तून मोठी अपडेट, ठाकरे गेम पालटणार; शरद पवार अन् काँग्रेसला धक्का देणारा शिवसेना आमदाराचा दावा समोर

Rajysabha Election News: माजी मंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा दावा धुडकावून लावतानाच संख्याबळ पाहता राज्यसभेची जागा आमचीच असल्याचं वारंवार म्हटलं आहे. शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रही असलेल्या संजय राऊतांना आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेमुळे यू टर्न घ्यावा लागला. आता आदित्य ठाकरेंनंतर आणखी एका शिवसेनेच्या आमदारानं शरद पवार नव्हेतर आपल्याच पक्षाचा राज्यसभेवर दावा असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत शुक्रवारी(ता.27) मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, आताच्या संख्याबळानुसार आमचं संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाणार असल्याचं सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

वरुण सरदेसाई यांनी शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक असतील आणि त्यांच्या पक्षाच्या नेते वा महाविकास आघाडीकडून तसं बोललंही गेलं असलं तरीही आम्ही आमचा राज्यसभेच्या जागेसाठीचा दावा सोडणार नसल्याचं रोखठोक विधान केल्यामुळे शिवसेनेसह मित्रपक्ष काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आमच्या शिवसेनेच्या राज्यसभेच्या जागेवरचा दावा कायम असणार आहे. विधान परिषद आणि राज्यसभा या दोन वेगवेगळ्या जागा असल्याचंही सरदेसाई यांनी स्पष्टपणे म्हटलं. त्याचवेळी विधान परिषद आणि राज्यसभा हे दोन वेगवेगळे विषय असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच आणखी धक्कादायक मत मांडताना विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्यानं ती जागाही आमचीच असल्याची भूमिकाही सरदेसाईंनी स्पष्ट केलं.

Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
Sameer Wankhede Case : मोठी बातमी : समीर वानखेडे प्रकरणात कोर्टाचा मोदी सरकारला दणका; ठोठावला दंड; नेमकं काय घडलं?

आमच्या शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर आपलं मत मांडले. त्यात राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 2020 ला आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. त्यानंतर संजय पवार आमचे उमेदवार दिलेले असताना आणि संख्याबळ असताना सुद्धा ते पराभूत झाल्याचं नमूद केलं.

तसेच आता संख्याबळानुसार आमचं संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळपूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल, असं वरुण सरदेसाई सांगितलं आहे. यामुळे आगामी काळात शिवसेनेसह मविआच्या गोटातल राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीबाबत दिल्लीतून मोठी अपडेट; भाजप उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार, मुहूर्तही ठरला!

आदित्य ठाकरेंचा दावा काय...?

शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी 2020 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा दिली होती. त्यामुळे यावेळी राज्यसभेची जागा आम्हाला मिळायला हवी असं स्पष्टपणे म्हटलं आहे. राज्यसभेत पक्षाचे खासदार संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी सातत्याने प्रभावीपणे लढा देत आहेत. “हा लढा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, देशाच्या अदानीकरणाच्या विरोधात आहे, धारावी विकण्याच्या विरोधात आहे, तसेच मुंबई आणि महाराष्ट्र विकण्याच्या प्रयत्नांविरोधात आहे. हा लढा आम्ही ठामपणे देत आलो आहोत, असेही ते म्हणाले.

इंडिया आघाडीत गेल्या पाच वर्षांत ठामपणे राहिलेला आमचा पक्ष एकमेव असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी राज्यसभेच्या दोन्ही जागांवरही आमचाच हक्क असल्याचं सांगत एकप्रकारे मित्रपक्षांना इशाराच दिला आहे. राज्यसभेच्या एका जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनंतर आता आमदार वरुण सरदेसाई यांनीही दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com