Abhishek Ghosalkar Shot Dead : इतना सन्नाटा क्यो हैं भाई...? अभिषेकच्या हत्येनंतर घोसाळकर कुटुंबीय पुरते हादरले

Shivsena Leader News : सर्व आयुष्य राजकारणाला वाहून घेतलेल्या या लोकप्रतिनिधीला शेवटी या राजकीय व्यवस्थेत आपल्या मुलाचा बळी द्यावा लागला, यापेक्षा त्यांच्या नशिबी कुठलं मोठं दुःख असू शकतं!
Abhishek Ghosalkar Shot Dead
Abhishek Ghosalkar Shot DeadSarkarnama
Published on
Updated on

संजय परब

Mumbai News : शोले चित्रपट आपण सर्वांनी बघितलाय...गावावर दहशत राहावी; म्हणून गब्बर सिंग रहीम चाचाच्या मुलाची म्हणजे सचिनची हत्या करतो. सचिनचे प्रेत गावात येते आणि गावकरी सुन्न होतात...स्मशान शांतता पसरते! त्यावेळी अंध रहीम चाचा म्हणजे ए. के. हंगल म्हणतात, ‘इतना सन्नाटा क्यों है भाई’ अन्‌ आपण सर्व प्रेक्षक आतून बाहेरून पुरते हादरून जातो. मुलाचे प्रेत खांद्यावर घेण्यापूर्वी ते सांगतात, ‘जिवंतपणी बापाला मुलाचं मरण पाहावं लागलं, याहून मोठं दुर्दैव काहीच नाही.’ रहीम चाचाची ही अगतिकता आपल्या डोळ्यांच्या खाचा करते. आज हा प्रसंग आठवण्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे युवा नेता अभिषेक घोसाळकर यांची झालेली हत्या आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात! (Ghosalkar family in mourning after Abhishek's murder)

अभिषेक यांना दोन लहान मुलं आहेत. त्यांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपलं आहे. आता पुढे काय? हा सवाल जोडीदार गमावलेल्या त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांना सतावत असेल. तेजस्विनी या नगरसेविका असल्या तरी त्या कोणाच्या तरी पत्नी होत्या. सर्वात भयंकर म्हणजे माजी आमदार विनोद घोसाळकर यांची झालेली भयानक अवस्था. सर्व आयुष्य राजकारणाला वाहून घेतलेल्या या लोकप्रतिनिधीला शेवटी या राजकीय व्यवस्थेत आपल्या मुलाचा बळी द्यावा लागला, यापेक्षा त्यांच्या नशिबी कुठलं मोठं दुःख असू शकतं! आज ते आपल्या मुलाचं पार्थिव घेऊन निघाले तेव्हा ‘शोले’सारखा परिस्थिती होती.... (Abhishek Ghosalkar Shot Dead )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhishek Ghosalkar Shot Dead
Sangli DCC Bank : मानसिंगराव नाईक ॲक्शन मोडवर; 19 अधिकाऱ्यांचे पथक लावले कामाला...

खरंतर बोरिवली आणि दहिसर परिसर हादरून गेलाय. घोसाळकर कुटुंबीय कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर घोसाळकर कुटुंबाने उद्धव ठाकरे यांना साथ दिली. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत. दहिसर कांदारपाडा वॉर्ड नं 7 चे नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. मुंबई महापालिकेत दोनदा नगरसेवक पद भूषवलं आहे. तर विनोद घोसाळकर यांनी 2009 ते 2014 या कालावधीत मुंबईतील दहिसरचे आमदार होते. दहिसरमधील तरुण नेतृत्व म्हणून अभिषेक यांची ओळख होती. याशिवाय ते मुंबै बँकेचे संचालकही आहेत.

Abhishek Ghosalkar Shot Dead
Thorat on Firing Incident : 'दोन उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, सत्तेच्या महत्त्वाकांक्षेमुळे तिघेही अपयशी'

अभिषेक यांच्या पत्नी तेजस्विनी वॉर्ड क्रमांक एकच्या नगरसेविका होत्या. बोरिवली, दहिसर मतदार संघात घोसाळकर कुटुंबाचा मोठा राजकीय दबदबा आहे. अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नेता म्हणून अभिषेक यांची प्रतिमा होती. उत्तम इंग्रजी बोलणारा आणि राजकारणात राहूनही एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यासारखा अभिषेक यांचा वावर राहिला आहे.

विनोद घोसाळकर यांनी बोरिवली आणि दहिसर नव्हे; तर उपनगरात शिवसेनेचा प्रचार प्रसार करण्याची मोठी जबाबदारी पार पाडली आहे. शिवसेना उपनेते, विभागप्रमुख असताना उपनगरात शिवसेनेचे आमदार, नगरसेवक निवडून यावेत, यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला आणि तसा रिझल्टही दिला. यामुळेच मातोश्री त्यांच्यावर विश्वास ठेवून होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनासुद्धा ते आपले वाटत होते, असा त्यांचा शिवसेनेत वावर होता.

Abhishek Ghosalkar Shot Dead
Satara Politics : पृथ्वीराजबाबांमुळेच गोरे आज नेते म्हणून मिरवित आहेत; काँग्रेसचा चव्हाणांसह भोसलेंवर पलटवार

रायगड जिल्ह्यातसुद्धा शिवसेना त्यांनी सर्वत्र नेली. श्रीवर्धन मतदार संघातून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यांचा राजकारणाचा वारसा अभिषेक पुढे चालवत होते. आदित्य ठाकरे यांच्या युवा नेत्यांच्या फळीतील ते एक प्रमुख नाव होते. हत्येपूर्वी ते काही तास अगोदर आदित्य यांच्याशी एक बैठकसुद्धा करून आले होते.

Abhishek Ghosalkar Shot Dead
Abhishek Ghosalkar Shot Dead : घोसाळकर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; मॉरिसच्या पीएसह दोन जण ताब्यात

एकूणच अभिषेक यांचा मृत्यू घोसाळकर कुटुंबालाच नव्हे; तर सर्व राजकीय परिवारांना चटका लावून जाणारा आहे. नेते, कार्यकर्ते, आजूबाजूची माणसं आज विनोद घोसाळकर यांना भेटायला येतील, त्यांचं सांत्वन करतील. पण, आपण जिवंत असताना आपला मुलगा मात्र दूर कुठेतरी निघून गेलाय, ही भळभळती जखम घेऊन आता त्यांना आयुष्याला सामोरं जावं लागेल..!

Edited By : Vijay Dudhale

Abhishek Ghosalkar Shot Dead
Maratha Reservation : ॲड. सदावर्तेंना बारसकरांनी माहिती पुरवली; मराठा समाजाच्या बैठकीत दाखवला भेटीचा फोटो...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com