Audio Clip Viral : एकनाथ शिदेंच्या माजी महापौरांची ऑडिओ क्लिप व्हायरल; वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद; मीनाक्षी शिंदेंनी बाजू मांडली!

Thane Shivsena Meenakshi Shinde : ठाणे महापालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच माजी महापौरांचे वादग्रस्त वक्तव्य असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
Meenakshi Shinde Audio Clip Viral
Meenakshi Shinde Audio Clip Viralsarkarama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

TMC Election : ठाणे पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. अशातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असताना आता, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक अधिक चर्चेचा विषय ठरली आहे.

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर प्रसारित झाली. त्यामुळे मीनाक्षी शिंदे या वादात सापडल्या आहेत. या क्लिपची पुष्टी 'सरकारनामा' करत नाही.

ठाणे महापालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर हा परिसर येतो. या भागातून माजी महापौर आणि शिंदेच्या शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे या निवडूण येतात. याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भुषण भोईर हे गेल्यावर्षी निवडूण आले आहे.

अशातच त्यांच्यात असलेले राजकीय मतभेद त्यातून भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी मिनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनीही उघडपणे भुमिका मांडली होती. त्यानंतर वायचळ यांच्या विरोधात पक्षाने कारवाई करीत निलंबित केले. त्यावेळी नाराज झालेल्या मीनाक्षी शिंदे यांनीही राजीनामा दिला होता.

या घडामोडी नंतर अखेर शिंदेसेनेने भूषण यांची उमेदवारी डावलत वायचळ यांना उमेदवारी दिली होती. यामुळे भूषण यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केली.

Meenakshi Shinde Audio Clip Viral
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन उतरले मैदानात; तिन्ही आमदारांना लावले कामाला!

दरम्यान, एक ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाली असून या मध्ये एक व्यक्तीशी मीनाक्षी शिंदे या संवाद साधत असून त्यात त्यांनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे आगरी समाजात तीव्र नाराजीचा सूर उमटत असून या वक्तव्याचा जाहीर निषेध केला जात आहे.

मीनाक्षी शिंदेंनी बाजू मांडली

प्रभाग क्रमांक ३ मध्ये आमच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. आपण जिंकणार नाहीत हे लक्षात त्यातूनच असे फेक ऑडिओ त्यांनी प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एआयच्या मार्फत काही व्हिडीओ तयार केले असून १२ तारखेला ते देखील प्रसारित करण्यात येणार असल्याचे समजत आहे, असे म्हणत मिनाक्षी शिंदे यांनी हा ऑडिओ फेक असल्याचे सांगितले.

16 तारखेला उत्तर मिळेल

चरित्रमलीन करून जर ते निवडणुका जिंकू शकतात असे त्यांना वाटत असले तर ते दुर्भाग्याचे आहे. राजकारणात विचाराची लढाई असावी, कोणाच्या खासगी आयुष्यावर टीका करू नये, असे घाणेरडे राजकारण बाहेरच्या लोकांनी इथे येवून हे चालविले आहे. त्यांना हद्दपार करण्यासाठी मनापाड्यातील जनता सज्ज झाली आहे. १६ तारखेला त्यांना त्यांचे उत्तर मिळेल, असे देखील मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.

Meenakshi Shinde Audio Clip Viral
Raj Thackeray : 'महाजनांपेक्षा लाकूडतोड्या बरा, हे झाडांआधी कार्यकर्ते छाटतात अन् बाहेरून मागवलेली झाडे...'; तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंनी भाजपला घेरलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com