Mehboob Shaikh Controversy : राष्ट्रवादीचे मेहबूब शेख गोत्यात; मुंबई पोलिसांनी दाखल केला ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Mumbai Police Lodges Atrocity Case On Mehboob Shaikh : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल...
Mehboob Shaikh
Mehboob ShaikhSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : राष्ट्रवादी युवक (शरद पवार) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात अखेर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांची चौकशी करण्यात येत होती.

Mehboob Shaikh
Mehboob Shaikh Controversy : आमदार निवासात मेहबूब शेख यांच्याशी झटपट; अॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी!

काय आहे प्रकरण?

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास येथे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या खोलीवर काल रात्री मेहबूब शेक हे मुक्कामी होते. यावेळी एक तरुण मद्यधुंद अवस्थेत क्षीरसागर यांच्या खोलीवर येऊन मुक्कामाचा हट्ट करू लागला. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर शिवीगाळ केल्याने मेहबूब शेख यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप फिर्यादी तरुणाने केला आहे.

मेहबूब शेख यांनी जातीवाचक शिवीगाळ करून आपल्याला मारहाण केल्याच्या आरोप तरुणाने केला. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार फिर्यादीने केली. या प्रकरणी पोलिसांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मेहबूब शेख यांना चौकशीसाठी बोलावले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दुपारी १ वाजेपासून राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची चौकशी सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार ही चौकशी रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू होती. जवळपास सात तासांपासून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अखेर पोलिसांनी मेहबूब शेख यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कलम 324, 506 (2), 294, 34 आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

edited by sachin fulpagare

Mehboob Shaikh
Saurav Patil News : गुणरत्न सदावर्ते यांना धक्का, सहकार आयुक्तांनी केली हकालपट्टी....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com