Mhada : मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! म्हाडानं स्थगित केलेल्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावरील घरांसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरु

Mhada : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ११८ सदनिकांची विक्री जाहीर करण्यात आली आहे.
MHADA
MHADASarkarnama
Published on
Updated on

Mhada : 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्वावर म्हाडानं विक्रीसाठी काढलेल्या सदनिकांची योजना स्थगित करण्यात आली होती. ही योजना पुन्हा सुरु होत असून उद्यापासून अर्थात १७ फेब्रुवारी २०२६ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यासाठी म्हाडाच्या अधिकृतसंकेस्थळावर जाऊन अर्ज करण्याचं आवाहन म्हाडाच्यावतीनं करण्यात आलं आहे.

MHADA
Tushar Bhosle: "सत्तारांनी हिंदु धर्म स्वीकारलाए का? नसेल तर बाहेरुनच दर्शन घ्यायला हवं होतं"; भाजपच्या तुषार भोसलेंची मुक्ताफळं

म्हाडानं नेमकं काय म्हटलं?

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ११८ सदनिकांची विक्री जाहीर करण्यात आली आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया ४ मार्चपासून सुरू होईल. सदनिका निश्चित केल्यानंतर ४८ तासांत विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे. इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडानं केलं आहे.

MHADA
Pune Congress Bhavan: महापौर मंजुषा नागपुरेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस हायकोर्टात जाणार; पहिला दगड कोणी भिरकावला? याचाही फैसला तिथंच होणार

स्थगिती का दिली होती?

यापूर्वी म्हाडाकडून १२० सदनिकांसाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्वावर ३ फेब्रुवारी रोजी जाहीरात काढली होती. या जाहिरातीनुसार, ५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु होणार होती. पण तत्पूर्वी पूर्वसंध्येला म्हणजे ४ फेब्रुवारीरोजी अचानक म्हाडाकडून याला स्थगिती जाहीर केली होती. यासाठी तांत्रिक कारणांमुळं ही स्थगिती दिल्याचं स्पष्टीकरण म्हाडाकडून देण्यात आलं होतं. तसंच लवकरच ही त्रांतिक तृटी दूर करुन नव्यानं जाहीरात काढण्यात येईल असंही म्हाडानं जाहीर केलं होतं.

MHADA
Sunil Tatkare: "रोहित पवार नावाचे गृहस्थ राजकारणात..."; विसंवादांच्या चर्चांवर तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

कुठे आहेत म्हाडाच्या सदिनिका?

अँटॉप हिल - ३५ सदनिका, तुंगा पवई - ४४, शिंपोली कांदिवली - ८, जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम - ७, भायखळा - ६, ताडदेव - ६, लोअर परळ - ४, चारकोप सेक्टर -८ - २, पीएमजीपी मानखुर्द - १, मालवणी - १, गायकवाड नगर मालवणी - १, घाटकोपर पूर्व - २, कन्नमवार नगर -१, सायन - २. इथं या म्हाडाच्या सदनिका असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com