
मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का निवडणूक आयोगाने दिला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह आता गोठवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता अंधेरी पोटनिवडणूकीत धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. मात्र काही अंशी ही गोष्ट शिंदे गटासाठी फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर शिवसेनेकडून आता प्रतिक्रीया उमटत आहेत.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. ही एक न्यायिक प्रक्रीया आहे. विनाकारण वेळकाढूपणा चालू आहे. आमची बाजू भक्कमपणे आम्ही मांडू. आम्हाला अधिक वेळ मिळाला, ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आम्हाला कसलीही भिती नाही,जे काही असेल त्याला आम्ही सामोरे जाऊ. आम्हाला जे काही चिन्हं मिळेल, ते आम्ही घरोघरी पोहचवू. लोक चिन्हं नाही तर काम बघणार आहेत. आम्ही प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढू, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.
दरम्यान उद्धव ठाकरे गटाने अजून कागद पत्रे सादर करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र, आयोगाने आज चिन्हाबाबत आजच निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले होते की, निवडणूक आयोगाकडे देसाई यांनी सर्व प्रतिज्ञापत्र सादर केली. आम्ही सादर केलेल्या सर्व प्रति या सत्य आहे. शिवसेना कुणाची तर ती शिवसैनिकांची आहे. आमदार, खासदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी निवडून दिले म्हणून आम्ही निवडून आलो आहोत. पक्ष पहिला आहे. पक्षाला ते चिन्ह मिळालेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.