Mangalprabhat Lodha News: ठाकरेंच्या नाकावर टिच्चून 'BMC' त कार्यालय, मंत्री लोढांचा खड्डेमुक्त मुंबईसाठी 'मास्टर प्लान'

BMC Political News : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही लोढा यांना महानगरपालिकेतील कार्यालय देण्यास विरोध केला आहे.
Mangalprabhat Lodha Master Plan
Mangalprabhat Lodha Master PlanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांचे कार्यालय महापालिका मुख्यालयात सुरु केल्यामुळे यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही लोढा यांना महानगरपालिकेतील कार्यालय देण्यास विरोध केला आहे.

हुकूमशाही पद्धतीने घुसखोरी केल्याचा असल्याचा आरोप आदित्य ठाकरे केला होता. मात्र, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाकरेंच्या नाकावर टिच्चून महापालिका कार्यालयात बस्तान तर बसवलेच शिवाय मुंबईतील खड्ड्यांवरही महत्वपूर्ण निर्णय घेतले.

Mangalprabhat Lodha Master Plan
Congress Political News : विधानसभेला नवा विरोधी पक्षनेता बुधवारी मिळणार; काँग्रेसच्या हायकमांडकडून 'या' नावावर शिक्कामोर्तब ?

मुंबई उपनगरमधील के पश्चिम वॉर्ड, के पूर्व वॉर्ड व एल वॉर्ड येथील इर्ला मार्ग जंक्शन, व्ही. एम. मार्ग आणि एस. व्ही. मार्ग जंक्शन,सहार मार्ग जंक्शन, साकीनाका जंक्शन, कांजूरगाव इत्यादी ठिकाणी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रस्त्यांची पाहणी केली. लोढा यांनी अतिरिक्त प्रकल्प आयुक्त वेलरासु यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासु, उपायुक्त रस्ते संजय महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) मनीषकुमार पटेल आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले असून याची पाहणी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा(Mangalprabhat Lodha) यांनी केली. भविष्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांबाबत नागरिकांसाठी एक व्हाट्स अॅप तक्रार क्रमांक आणि अॅपद्वारे तक्रार प्राप्त झाल्यावर २४ तासात खड्डे बुजविले जावेत असेही आदेश दिलेत. प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले असून मुंबईतील खड्डे एका आठवड्यात बुजविले जातील असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

Mangalprabhat Lodha Master Plan
Pune Police News : मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोध; पोलिसांच्या रडारवर शहराध्यक्ष प्रशांत जगतापांसह काँग्रेस, राष्ट्रवादी

दोन वर्षांच्या आत रस्त्यांच्या काँक्रीटीकरण

लोढा म्हणाले, मुंबई(Mumbai) मध्ये गेले १० दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे विविध रस्त्यांवर खड्डे तयार झालेले आहेत. हे खड्डे तातडीने भरण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी मुंबई उपनगरातील सर्व रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासकीय दिल्या.(Latest Marathi News)

Mangalprabhat Lodha Master Plan
PM Modi Pune Visit Schedule: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेमका कसा असणार पुणे दौरा ?

सध्या खड्डे बुजविण्याच्या सुरु झालेल्या कामाचा वेग वाढवावा आणि या आठवड्या अखेरीपर्यंत मुंबईतील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत असे आदेश पालकमंत्री लोढा यांनी प्रशासनास दिले. आयुक्त यांनी सोमवारी सर्व अधिकाऱ्यांची तपशीलवार बैठक घेऊन खड्डे बुजवावेत यासाठी अ‍ॅक्शन प्लन तयार केला आहे.

प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी मास्टिक तंत्रज्ञानाने खड्डे भरण्यासाठी तातडीने हॉट मास्टिंग मशीन उपलब्ध करून द्याव्यात तसेच प्रत्येक विभागासाठी खड्डे बुजविण्यासाठी एक नोडल इंजिनियर नियुक्त करावा असे निर्देशही लोढा यांनी यावेळी दिले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com