एनसीबीची 90 टक्के प्रकरणं खोटी, वकील पुरावे गोळा करतायेत! नवाब मलिकांचा बॉम्ब

आर्यनला खान अटक केल्यानंतर नबाव मलिकांकडून सातत्याने एनसीबी व वानखेडे यांना लक्ष्य केलं जात आहे.
 Sameer Wankhede Nawab Malik
Sameer Wankhede Nawab Maliksarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कार्डिलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह (Aryan Khan) तिघांचा जामीन बुधवारी विशेष NDPS कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे मागील 13 दिवसांपासून तुरूंगात असलेल्या आर्यनचा मुक्काम आणखी वाढला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अंमलीपदार्थ विभाग (NCB) व विभागीय संचालक समीर वानखेडेंवर बॉम्ब टाकला आहे.

आर्यनला खान अटक केल्यानंतर नबाव मलिकांकडून सातत्याने एनसीबी व वानखेडे यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यांनी भाजपच्या इशाऱ्यावरून केवळ प्रसिध्दीसाठी व काही ठराविक लोकांना त्रास देण्यासाठी वानखेडे काम करत असल्याचा आरोप ते सातत्याने करत आहेत. आर्यनचा जामीन बुधवारी फेटाळल्यानंतर पुन्हा एका मलिक यांनी वानखेडे यांच्यावर निशाणा साधला.

 Sameer Wankhede Nawab Malik
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांची तलवार म्यान; विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सक्रीय

न्यायाधीशांच्या निर्णयावर कुठलाही आक्षेप नसल्याचे सांगत मलिक यांनी एनसीबीच्या युक्तीवादवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, किल्ला न्यायालयापासून एनडीपीएस न्यायालयापर्यंत एनसीबीने वेगवेगळा युक्तीवाद केला आहे. काही लोकांना अडकविण्यासाठी हा डाव आहे. असे बरेचसे डाव आम्ही पाहिले आहेत. आमच्या केसमध्ये पाच लाखाचे व्हॉट्स अॅप चॅट न्यायालयात दाखवत राहिले. पण त्याचा उल्लेख आरोपपत्रात केला नाही. लोकांना जामीन मिळू द्यायचा नाही, हे धोरण आहे. प्रसिध्दीसाठी लोकांना खोटं अडकविले जात आहे. पैसे गोळा करण्याचं, खंडणी वसुल करण्याचं काम मुंबईत त्यांच्याकडून सुरू आहे, असा आरोप मलिक यांनी केला.

 Sameer Wankhede Nawab Malik
आर्यनच्या जामिनासाठी भाजप नेत्यानं केली प्रार्थना अन् शुभेच्छाही...

जवळपास 90 टक्के अशी प्रकरणं खोटी असल्याचे न्यायालयात आज ना उद्या सिध्द होईल. मी काही पुरावे गोळा करत आहे. काही वकील या सगळ्या केसमध्ये पीआयएल दाखल करतील. त्याबाबतचे पुरावे गोळा केले जात आहेत. याची चौकशी झाली तर 90 टक्के प्रकरणं खोटी असल्याचे सिध्द होईल, असं मलिक यांनी सांगितलं. राजकीय लोकांच्या हस्तक्षेपाने ही यंत्रणा काम करत आहे. लोकांवर दबाव टाकून खोट्या केस केल्या जात आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

वानखेडे नावाने पैसे मागत असल्याची तक्रार वर्सोवाला आहे. यापूर्वी रेव्ह पार्टीवर कारवाई झाली आहे. त्यात प्रत्येकाला घेऊन युरिन आणि ब्लड सॅम्पल घेण्यात आलं. पण यावर्षी कोणतेही सॅम्पल घेतले जात नाही. खोट्या केस दाखल केल्या जात आहेत. समीर वानखेडे यांचा मोबाईल, फोन रेकॉर्डिंग तपासा, असं आव्हानही मलिक यांनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com