Shambhuraj Desai News : नेत्याच्या मुलाला शुभेच्छा द्यायला की गायकवाडांची विचारपूस करायला ठाण्यात?

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे यांचा आज वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी देसाई आज ठाण्यात येणार असल्याची चर्चा आहे. (Shambhuraj Desai News)
Shambhuraj Desai, Shrikant Shinde
Shambhuraj Desai, Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात येणार आहेत. त्यातच पालकमंत्री हे गोळीबारात जखमी झालेल्या गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस करणार आहेत. पण, शिवसेना कल्याण शहर प्रमुखावर गोळीबार झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी जाऊन रुग्णालयात चौकशी केली. पालकमंत्री म्हणून देसाई यांनी कालच रुग्णालयात येणे अपेक्षित होते. पण आज ते खासदारांच्या वाढदिवसादिवशी ठाण्यात येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Shambhuraj Desai News)

भाजप (BJP) आमदाराने केलेल्या गोळीबारात शिवसेना (Shiv Sena) कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) हे जखमी झाले. सुमारे सहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेत त्यांच्या अंगात घुसलेल्या सहा गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या. गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रुग्णालयाला भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या शहरप्रमुखावर हल्ला झाल्यानंतरही पालकमंत्री शनिवारी दिवसभरात पालकमंत्री ठाण्यात फिरकलेच नाही.

Shambhuraj Desai, Shrikant Shinde
NCP News: मालेगाव टेंडर घोटाळा; राष्ट्रवादीने मंत्री दादा भुसेंना घेरले?

आज खासदार शिंदे (Shrikant Shinde) यांचा 35 वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने खासदारांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री ठाण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान मंत्री रुग्णालयात जाऊन गायकवाड यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहेत. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलणार असल्याचेही अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालकमंत्र्यांचे आज ठाण्यात येणे हे गायकवाड यांची चौकशीसाठी आहे की खासदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे असेच चर्चा आता उघड उघडपणे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे, खासदार शिंदे या दोघांनी रुग्णालयात तातडीने धाव घेत गायकवाड यांच्या प्रकृती विचारपूस केली. पण देसाई हे ठाण्याचे पालकमंत्री आणि गृह खात्याचे राज्यमंत्रीही असताना येण्यासाठी दोन दिवस लावल्याने चर्चांना उधाण आले आहे.

(Edited By - Rajanand More)

Shambhuraj Desai, Shrikant Shinde
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या माजी नगरसेवकाने फाडले महिलांचे बॅनर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com