Lok Sabha Election 2024 : भाजपच्या माजी नगरसेवकाने फाडले महिलांचे बॅनर

Vanchit Bahujan Aghadi : गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी
Banner Tore in Akola
Banner Tore in AkolaSarkarnama
Published on
Updated on

Akola BJP : ‘आम्ही भाजपचे मतदार आहोत मात्र भाजपच्या कोणत्याही नेत्याने आमच्या एरियात मत मागायला येऊ नये’, अशा आशयाचे बॅनर चर्चेचा विषय बनल्यानंतर हे बॅनर भाजपच्या माजी नगरसेवकाने फाडून टाकले आहे. बॅनर फाडणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘वंचित’ने केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसे अकोल्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एकमेकांविरोधात विविध पक्ष उभे ठाकले आहेत. असे असताना अकोल्यातही राजकीय रणसंग्रामाच्या पूर्वीच वातावरण चांगलेच गरम झाले आहे. अशात एका बॅनरची चर्चा अकोला शहरात होती. हे बॅनर लागले होते, अकोला शहरातील गोरक्षण रोडवरील सहकार नगर रोड परिसरात.

Banner Tore in Akola
Banner Politics: ‘आम्हाला मत मागायला येऊ नका..!’ अकोल्यात आगळीवेगळी बॅनरबाजी

या बॅनरवर थेट भाजपच्या लोकप्रतिनिधींवरच ताशेरे ओढले होते. ‘आम्हाला मतदान मागायला येऊ नये’, असेही या बॅनरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऐन निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे बॅनर लावत विरोध केल्याने हे बॅनर चर्चेचा विषय बनले होते. परिसरातील महिलांचे फोटो असलेल्या या बॅनरवर ‘अकोल्यात 30 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. आम्ही भाजपचे मतदार आहोत. भाजपचे खासदार, आमदार आणि नगरसेवक आहेत. मात्र गेल्या 30 वर्षांपासून आम्हाला सर्व्हिस लाइन नाही. रोड नाही, त्यामुळे कोणत्याही भाजपच्या नेत्याने मतदान मागण्यास आमच्या एरियात येऊ नये’, असे या बॅनरवर म्हटले होते.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून चर्चेत आलेले हे बॅनर भाजपचे माजी नगरसेवक बाळू देशमुख यांनी फाडले आहे. बॅनर फाडतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये रस्ता व नाली नसल्याने स्थानिक महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लावलेला बॅनर भाजपचे माजी नगरसेवक यांनी फाडला असल्याचा आरोप ‘वंचित’ने केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशा प्रकारची दादागिरी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला अकोला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकाव्या अशी मागणीही वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी जिल्हाधिकारी व अकोला पोलिसांना केली आहे. बॅनरवर महिलांचा फोटो होता. बॅनर फाडणे हा एकप्रकारे महिलांचा अवमान असून नारी शक्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया ‘वंचित’कडून देण्यात आली आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात लावण्यात आलेले बॅनर चर्चेत आल्यानंतर ते बॅनर फाडल्याने यात आता ‘वंचित’ने उडी घेतली आहे. त्यामुळे वंचित विरुद्ध भाजप असा राजकीय सामना अकोल्यात ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात रंगण्याची शक्यता वाढली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Banner Tore in Akola
गृहिणींचा तो बॅनर भाजप नगरसेवकाने फाडला ; बघा अकोल्यात काय घडलं ? | Akola Constituency | BJP |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com