Crime News: मीरा-भाईंदर शहरातील भाजपच्या माजी नगरसेविका गोव्याला गेल्या होत्या. तेथे डान्स करत असताा त्यांचा खासगी व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी माजी नगसेविकांनी संताप व्यक्त करत नवघर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
व्हिडिओ व्हायरल करण्यामागे आमदार आणि एका भाजप नेत्याचा हात असल्याचा आरोप देखील या माजी नगरसेविकांनी केला आहे.
माजी नगरसेविकांनी संताप व्यक्त करताना फोटो व्हिडिओ व्हायरल करत बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. जो पर्यंत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका माजी नगरसेविकांनी घेतली.
गोव्याला दोन दिवसांच्या ट्रीपसाठी या महिला नगरसेविका गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी खासगीमध्ये डान्स केला. त्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. व्हिडिओ व्हायरल झालेल्या नगरसेविका या एका भाजप BJP माजी आमदाराच्या समर्थक म्हणून ओळल्या जातात. त्यामुळे त्यांच्याच पक्षातील विरोधकांनी व्हिडिओ व्हायरल करत माजी आमदारावर निशाणा साधल्याचा आरोप होत आहे.
नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना माजी नगरसेविकांनी घेरावा घातला. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका माजी नगरसेविकांनी घेतला. त्यामुळे पोलिस देखील अॅक्सन मोडवर आले आहेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर देखील पोलिस गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.