Meera Bhayander: शिंदे गटातील माजी आमदार गिल्बर्ट जॉन मेन्डोन्सा (Gilbert John Mendonsa) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तन सागरी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे.
एका पीडितेच्या तक्रारीवरुन त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेन्डोन्सा सध्या शिंदे गटासोबत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी उत्तन परिसरात शिंदे गट उमेदवारांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. मेन्डोन्सा यांनी शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.
गिल्बर्ट मेन्डोन्सा हे मीरा भाईंदर विधानसभेचे माजी आमदार आहेत. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून ते आमदार झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.