Mumbai : शिवसेनेच्या दोन्ही गटांतील आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी आज (गुरुवारी) होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर ही सुनावणी होत असून, निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सुनावणीपूर्वी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर, शिंदे गट, अजित पवार गटातील आमदारांवर टीका केली आहे.
"विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनेक पक्ष बदलले आहेत, ते कायद्याचे जाणकार आहेत, ते चालढकल करीत आहेत. अपात्र आमदारांबाबतचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी व्हायला पाहिजे होता. पण नार्वेकरांनी निर्णय न घेता घटनेशी द्रोह केला आहे," असे संजय राऊत म्हणाले. "अपात्रेताबाबतचा निर्णय घेण्यास अजून किती दिवस लागतील,? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
"अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदारही अपात्र होतील, पवार-फडणवीस यांना घटनाबाह्य सरकार चालविताना दमछाक होत आहे. जनतेच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे," असा आरोप राऊतांनी केला.
शिवसेना शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा राहुल नार्वेकरांनी बजावल्या आहेत. प्रत्यक्ष सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि अॅड. असिम सरोदे हे ठाकरे गटाकडून युक्तिवाद करणार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्यास वैयक्तिक म्हणणं मांडण्याची तयारीही ठाकरे गटाच्या आमदारांनी केल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गटानंही कायदेशीर लढाईसाठी जय्यत तयारी केली आहे.
एकाच दिवशी सर्व आमदारांची आज सुनावणी होणार आहे. तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावले जाणार आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.