MLA Disqualification Case : कोण अपात्र ठरणार ? शिंदेंचे चाळीस, ठाकरेंचे सोळा आमदार सुनावणीसाठी आज एकाच छताखाली...

Thackeray VS Shinde: विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी घेण्यात येणार आहे.
MLA Disqualification News :
MLA Disqualification News :Sarkarnama
Published on
Updated on

ShivSena MLA News: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवले आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्व आमदारांना नोटीस बजावत आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली होती. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर आता या प्रकरणात आज (गुरुवारी) दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष सुनावणी होत आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी घेण्यात येणार आहे.

राहुल नार्वेकरांनी शिवसेना शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे 500 पानी लेखी म्हणणं मांडले आहे.

MLA Disqualification News :
Sholay Style Andolan: मराठा आरक्षणासाठी तरुणाचे "शोले स्टाइल" आंदोलन; मुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

प्रत्यक्ष सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि अॅड. असिम सरोदे हे ठाकरे गटाकडून युक्तिवाद करणार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्यास वैयक्तिक म्हणणं मांडण्याची तयारीही ठाकरे गटाच्या आमदारांनी केल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गटानेही कायदेशीर लढाईसाठी जय्यत तयारी केली आहे.

सर्व आमदारांची एकाच दिवशी आज सुनावणी होणार आहे. तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावले जाणार आहे.

शिवसेनेचे ५४ आमदार या सुनावणीसाठी एकाच छताखाली येणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले सगळे आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचीही सुनावणी होणार आहे.

Edited By : Mangesh Mahale

MLA Disqualification News :
Omraje Nimbalkar News : 'हे' ट्रिपल इंजिनचे सरकार बघा, मराठा आरक्षण किती गांभीर्याने घेतंय; ‘त्या’ व्हिडिओवरून ओमराजे संतापले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com