Budget Session 2025 : ‘संगमेश्वरात संभाजीराजेंचे, आग्र्यात शिवरायांचे भव्य स्मारक...’ अजितदादांच्या एकामागून एक घोषणा अन्‌ विधानसभा जयजयकाराने दुमदुमली!

Ajit Pawar's announcement : अर्थमंत्री अजितदादा एकामागून एक घोषणा करत होते अन्‌ विधानसभेत शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा जयजयकार दुमदुमत होता.
Shivaji Maharaj-Sambhaji Maharaj-Ajit Pawar
Shivaji Maharaj-Sambhaji Maharaj-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 10 March : महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. त्यात त्यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे, कोकणातील संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराज यांचे, तर हरियानातील पानिपत येथे मराठ्यांच्या पराक्रमी युद्धाचं भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. अजितदादा एकामागून एक घोषणा करत होते अन्‌ विधानसभेत शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा जयजयकार दुमदुमत होता.

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मुघलांच्या नैजरकैतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यात नजरकैदेत होते, त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि त्या ठिकाणी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल.

भावी पिढीला शिवाजी महाराजांचे (Shivaji Maharaj) स्फूर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत दोन टप्प्याला गती देण्यासाठी आणखी 50 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Shivaji Maharaj-Sambhaji Maharaj-Ajit Pawar
Anjali Damania : ‘तू जास्त बोलल्यामुळे मला त्रास होतोय, धनंजय मुंडे बालाजी तांदळेवर भडकलेत’; तीन मोबाईलवरून मुंडे आरोपींना मेसेज पाठवायचे’

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि विस्तार करण्यासाठी जीवन समर्पित केलेले, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांमध्ये विजयश्री मिळविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याच्या खुणा महाराष्ट्रात जिथं आहेत, ते कोकणातील संगमेश्वर हे ठिकाण आहे. औरंगजेबच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील, एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी करतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचं बलिदानस्थळ असलेल्या तुळापूर आणि वढू बुद्रूक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम जोरात सुरू आहे. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली आहे.

Shivaji Maharaj-Sambhaji Maharaj-Ajit Pawar
Maharashtra Budget 2025 : फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी अजितदादांनी सोडला सैल हात; मोठ्या निधीची केली घोषणा

स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियानातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हरियानातही आमचेच मुख्यमंत्री आहेत, त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलतील आणि स्मारकासाठी जागा घेतील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com