Uddhav Thackeray News : मुंबईमध्ये महाविकास आघाडीने मोहा मोर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये महापुरूषांचा अवमान, राज्यातील प्रकल्प, शेतकरी, बेरोजगारी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अशा विविध मुद्यावर शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. शिवसेना (Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Congress) यांच्यासह अनेक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
एकीकडे आघाडीचा महामोर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईत मोठे खिंडार पडल्याची चर्चा आहे. महामोर्चात सहभागी न होता ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत एका स्थानिक कार्यक्रमात उपस्थित झाल्याचे दिसून आले, यावरुन ही चर्चा रंगली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करुन 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर खासदारांनीही शिंदे यांची साथ दिली. सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी व नेते मंडळी शिंदे गटात सहभागी होत आहेत. यातच आता आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. यामुळे ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.
आघाडीच्या महामोर्चात सहभागी न होता ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या सोबत एका स्थानिक कार्यक्रमात उपस्थित असल्याचे दिसून आले. चेंबूरमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उद्धघाटन कार्यक्रमात फातर्फेकर व पाटणकर उपस्थित झाल्यामुळे राजकिय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये राज्यभरातील तीनही पक्षाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. डाव्या संघटनांनी देखील महामोर्चाला पाठिंबा दिला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. आपापल्या पक्षाचे झेंडे आणि निषेध फलक घेऊन कार्यकर्ते सहभागी झाल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.