MLC Election 2024 : अनिल परबांविरोधात शिंदे गट माजी मंत्र्यांना उतरविणार?

Anil Parab News : मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस यांचा पत्ता कट करत उद्धव ठाकरे यांचे शिलेदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
uddhav thackeray anil parab eknath shinde
uddhav thackeray anil parab eknath shindesarkarnama

Mumbai News, 25 May : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या प्रत्येकी दोन जागांसाठी निवडणूक आयोगानं सुधारीत वेळापत्रक शुक्रवारी ( ता. 24 ) जाहीर केलं आहे. या घोषणेनंतर शिवसेनेनं ( ठाकरे गट ) दोन उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरे गटानं उमेदवार जाहीर करताच शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवाराचं नाव समोर आलं आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून ( mumbai graduate constituency ) विलास पोतनीस ( Vilas Potnis ) यांचा पत्ता कट करत उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे शिलेदार अनिल परब ( Anil Parab ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच मुंबई पदवीधर मतदारसंघातून माजी मंत्री दीपक सावंत यांचं नाव चर्चेत आलं आहे. सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनिल परब विरुद्ध दीपक सावंत, अर्थात शिवसेना विरुद्ध शिवसेना, असा सामना मुंबई पदवीधर मतदारसंघात रंगू शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दीपक सावंत ( Deepak Sawant ) हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. उत्तर पश्चिम ( वायव्य ) मुंबई लोकसभा मतदारसंघातून दीपक सावंत यांनी तयारी केली होती. येथून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर ( Ravindra Waikar ) यांना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर ( Amol Kirtikar ) यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती.

दीपक सावंत कोण आहेत?

दीपक सावंत शिवसेनेकडून दोनवेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते. 2006, 2012 मध्ये मुंबई पदवधीर मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर 2018 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारली. भाजप आणि शिवसेनेच्या महायुती सरकारमध्ये दीपक सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती. त्यासह भंडारा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही दीपक सावंत यांच्याकडे होते.

शिवसेनेकडून दोघांना उमेदवारी जाहीर

विधान परिषदेसाठी शिवसेनेनं ( ठाकरे गट ) दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार अनिल परब यांना मुंबई पदवधीर मतदारसंघातून तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

uddhav thackeray anil parab eknath shinde
Parab Attack On Shinde : मोदींच्या बहिणीला शिंदे तिकिट देऊ शकले नाहीत; विधानसभेला किती माना कापणार?

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

अधिसूचना : 31 मे 2024

अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 7 जून

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : 12 जून 2024

मतदान : 26 जून 2024, सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत

मतमोजणी : 1 जुलै 2024

uddhav thackeray anil parab eknath shinde
Sanjay Shirsat V/S Ravindra Dhangekar : काँग्रेसच्या धंगेकरांनी स्टंटबाजी थांबवावी, शिवसेनेच्या शिरसाट यांनी फटकारले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com