पुढच्यावेळी महालक्ष्मी रेसकोर्सवर घोडेबाजार होईल! मतदानाला जाण्याआधी ठाकूरांचं सूचक विधान

बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी सर्व पक्षांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
Hitendra Thakur Latest Marathi News
Hitendra Thakur Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

(MLC Election 2022 Latest News)

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीसाठीही (Legislative Council Election) बहुजन विकास आघाडीची तीन मतं महत्वाची मानली जात आहेत. राज्यसभेमध्ये त्यांनी कुणाच्या पारड्यात मतं टाकली, हे त्यांनी उघड केलेले नाही. पण भाजपच्या उमेदवाराच्या विजयानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांचं नाव घेतलं होतं. तसेच भाजपने घोडेबाजार केल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यावरून ठाकूर यांनी सोमवारी विधान परिषदेच्या मतदानाला जाण्याआधी सूचक विधान केलं आहे.

हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) हे निवासस्थानापासून पावणे बारा वाजण्याच्या सुमारास विधानभवनाकडे रवाना झाले. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांचे पुत्र आमदार क्षितिज ठाकूर हेही पहाटे परदेशातून मुंबईत दाखल झाले आहेत. ते विधान भवनातच आपल्याला भेटणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

Hitendra Thakur Latest Marathi News
मुख्यमंत्री अलर्टवर; प्रत्येक विधानसभा आमदाराच्या मागावर विधान परिषदेचा एक सदस्य

राज्यसभा निवडणुकीतील घोडेबाजाराच्या दाव्यावर बोलताना ठाकूर म्हणाले, घोडेबाजाराची एकदा चौकशी करावी. ज्यांना वाटते त्यांनी जाहीर करून टाकावे. कुणाकडून कुणी काय घेतलं, हे सांगावे. मग पुढच्यावेळी आपण महालक्ष्मी रेसकोर्सवर मतदान घेऊ. तिकडे घोडाबाजार होईल.

आघाडीची तीन मतं कुणाला मिळणार, या प्रश्नावर त्यांनी मतदान गुप्त आहे, असं सांगितलं. तसेच आपल्या विकासासाठी ज्यांनी सहकार्य करायचं ठरवलं आहे. त्यांच्याकडे तीन मतं जातील. त्यांचा विजय होईल, असंही ठाकूर म्हणाले.

Hitendra Thakur Latest Marathi News
Vidhan Parishad Election 2022 Live : उमा खापरे यांना पडलेल्या एका मतावर आक्षेप...

राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार सेफ

दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी खरी लढत असली तरी प्रत्यक्षात भाई जगताप विरूध्द लाड असा हा सामना रंगणार आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही 'सेफगेम' खेळला जात आहे. सगळी गणितं लक्षात घेऊन राष्ट्रवादीनं अतिरिक्त मतं जमवली आहेत. काल एमआयएमच्या एका आमदाराचं मत राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता समाजवादी पक्षाचंही एक मत पारड्यात पाडण्यात पक्षाला यश आल्याचं समजतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com