

Maharashtra politics news : राज्यात विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या दहा जागांपैकी भाजपच्या वाट्याला सहा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे. आघाडीला मिळू शकणाऱ्या एका जागेसाठी आता तीन पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ही जागा आपल्या पदरात पडावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घडामोडी घडत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीवेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
भेटीमध्ये विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेत जाणार का, याची सुरू असताना सपकाळ यांनीही त्यांच्या भेटीनंतर मोठं विधान केले आहे. मीडियाशी बोलताना सपकाळ यांनी सांगितले की, राज्यसभेची निवडणूक आम्ही लढवू शकलो नाही, हे खरं आहे. परंतू उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत. ते विधानपरिषदेत जात असतील तर नक्कीच आनंद आहे.
उद्धव ठाकरे निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत का, या प्रश्नावर सपकाळ यांनी त्यावर मी भाष्य करू शकत नाही, असे सांगितले. आजच्या भेटीमध्ये विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत चर्चा अपेक्षित नव्हती. पुढच्या काळात महाविकास आघाडीने पुढे कसे जायचे याबाबतचा संवाद होता, असेही सपकाळ यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईतील भाजपच्या मोर्चावरून वाद निर्माण झाल्यानंतर आयोजकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. यावर बोलताना सपकाळ म्हणाले, मोर्चात सहभागी झालेल्यांवर का गुन्हे दाखल करत नाही. शपथ घेतलेले मंत्री रस्त्यावर येऊन वाहतूक अडवतात, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा. माझ्या सोशल मीडियातून मी व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर हा व्हिडीओ कुणी दिला म्हणून माध्यमांच्या प्रतिनिधींना दमदाटी केली जात आहे, याचाही निषेध करायला हवा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.