ठाणे : मशिदीवरील भोंग्यांना विरोध करणारी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. त्यांनी हे भोंगे काढून टाकण्यासाठी राज्य सरकारला नवी डेडलाईन दिली आहे. यावरुन गदारोळ सुरू असताना आता राज ठाकरेंचे बॅनर दादरमध्ये लावण्यात आले आहे. मुस्लिम परिधान करीत असलेली गोल टोपी घातलेल्या राज ठाकरेंचे छायाचित्र या बॅनरवर आहे. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दादरमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहे. यावर काल, आज आणि उद्या? असे लिहिले आहे. कालच्या खाली राज ठाकरेंचे गोल टोपी घातलेले छायाचित्र आहे. आजच्या खाली भगवा रंग असून, त्यावर हनुमान असे लिहिले आहे. आजसमोर प्रश्चचिन्ह देण्यात आले आहे. यातून राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवर बोट ठेवण्यात आले आहे. आगामी काळात राज ठाकरे कोणती भूमिका घेतील, याचा उपरोधिक समाचार या बॅनरवर घेण्यात आला आहे. मात्र, राज ठाकरेंचे गोल टोपी घातलेले छायाचित्र या बॅनरवर लावण्यात आल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या दादरमध्ये हे पोस्टर लावण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. मागील काही दिवसांपासून राज यांचे गोल टोपी घातलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेच नेमके छायाचित्र या बॅनरवर लावण्यात आले आहे. या बॅनरला आता मनसेचे कार्यकर्ते कशा प्रकारे उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने शिवसेना भवनासमोर बाळासाहेब, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची छायाचित्रे असणारे बॅनर लावून हनुमान चालीसावरुन निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, असंही या बॅनरमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरेंचे बॅनर लावण्यात आले आहे.
मुंबईतील गुढी पाडव्याच्या सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांच्या सभेचे नुकतेच ठाण्यात आयोजन करण्यात आले होते. या सभेत भोंग्यांना विरोध करण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला होता. ते म्हणाले होते की, मशिदींच्या भोंग्याचा अख्ख्या देशाला त्रास होतोय, यात धार्मिक तेढ कुठे आहे? तुम्हाला अजान पडायची आहे, तर त्यांनी ती घरात पडावी. शहरातली रस्ते फूटपाथ कशाला अडवता? प्रार्थना तुमची आहे, ती आम्हाला कशाला ऐकवता? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मस्जिदीबाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.