राज ठाकरेंकडून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक अन् उद्धव ठाकरेंना म्हणाले 'भोगी'

मशिदीवरील भोंग्यांवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार विरूध्द मनसे आणि भाजप असा राजकीय वाद रंगला आहे.
Raj Thackeray News, CM Yogi Adityanath News, Raj Thackeray Latest Marathi News
Raj Thackeray News, CM Yogi Adityanath News, Raj Thackeray Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

लखनौ : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी भोंगे हटवण्यासाठी तातडीनं पावले टाकली आहेत. त्यांनी बुधवारपर्यंत विविध धार्मिक स्थळांवरील सहा हजार भोंगे उतरवले आहेत. त्यानंतर ठाकरेंनी योगींचे आभार मानले आहेत. (Raj Thackeray Latest Marathi News)

राज ठाकरे यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! महाराष्ट्र सरकारला सदबुध्दी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असं ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केलं आहे.

Raj Thackeray News, CM Yogi Adityanath News, Raj Thackeray Latest Marathi News
योगींनी करून दाखवलं! तब्बल सहा हजार भोंगे उतरवले अन् 30 हजार भोंग्यांचा आवाज केला कमी

मशिदीवरील भोंग्यांवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार विरूध्द मनसे (MNS) आणि भाजप (BJP) असा राजकीय वाद रंगला आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना पोलिसांची परवानगी घेणे बंधनकार केले आहे. याच पावलावर पाऊल टाकत योगी सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. पण त्यावरच न थांबता योगी सरकारने मागील काही दिवसांत विविध धार्मिक ठिकाणांवरील सहा हजारांहून अधिक भोंगे हटवले आहेत. तर 30 हजारांहून अधिक भोंग्यांच्या आवाजावर नियमानुसार निर्बंध लादले आहेत.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांवरील परवानगी न घेतलेले भोंगे हटवण्याची मोहिम राज्यभर हाती घेण्यात आली आहे. तसेच इतर सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मान्यतेप्रमाणे आवाज ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत बुधवार दुपारपर्यंत सहा हजार 31 भोंगे हटवण्यात आले आहेत. सर्वाधित 1366 भोंगे वाराणसी विभागातील असून त्यामध्ये मेरठ, बरेली आणि कानपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात योगींनी याबाबत निर्णय घेतला होता. प्रत्येकाला आपल्या पध्दतीनुसार पुजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण त्याचा इतरांना त्रास होऊ नये, असं योगी यांनी म्हटलं होतं. दरम्यान, मुंबई पोलिसांनीही भोंग्यांबाबत नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) मशिदी आणि मंदिरांना सुचना करण्यात आल्या असून दिलेल्या सुचनाचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com