Mumbai News: मनसेचे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अमेय खोपकर यांनी यासंदर्भात 'एक्स'वरून (ट्विटर) माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून खोपकर यांना पाठीचा त्रास होता. पण आता त्यांच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर खोपकर यांनी ट्विटरद्वारे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले आहेत, तसेच नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या आहेत. अमेय खोपकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात. अमेय खोपकरांनी मराठी चित्रपटांसाठी अनेक आंदोलने केलेली आहेत. याबरोबरच मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो मिळण्यासाठीदेखील त्यांनी लढा दिलेला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यात मनसेनेदेखील जोरदार प्लान आखला आहे. त्यासाठी काही नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका पाहता राज ठाकरे यांनी स्वत: बैठका घेत मनसैनिकांना कानमंत्र दिला. आता अमेय खोपकर आजारपणातून बरे झाल्यानंतर तेदेखील पक्षाच्या कामाला लागणार आहेत.
'हिंदुजा रुग्णालयाचे निष्णात सर्जन, रुग्णालय कर्मचारी, माझे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) या सर्वांचं पाठबळ लाभल्यामुळेच नवीन वर्षात मी नव्या उमेदीने सज्ज झालो आहे. माझ्या हितचिंतकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतानाच हेही सांगतो की, माझ्या पाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता लवकरच ताठ मानेने मी तुमच्यासमोर येणार आहे. सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि सर्वांना नववर्षाभिनंदन,' असं खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.