Raj Thackeray: 'सोडणार नाही' म्हणणाऱ्या फडणवीसांवर राज ठाकरे प्रचंड भडकले; एकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तू मुख्यमंंत्री ना रे महाराष्ट्राचा...'

MNS News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकवरुन टीका केलेल्या विरोधकांना फटकारलं. तसेच माझी बदनाम करा, पण महाराष्ट्राची बदनामी कराल तर कोणालाही सोडणार नाही, अशा इशाराही मुख्यमंत्र्‍यांनी दिला. हीच बाब आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खटकली.
Raj Thackeray & Devendra Fadnavis
Raj Thackeray & Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई-पुणे महामार्गावरील 'मिसिंग लिंक'वर दरड कोसळल्याचं दिसून आलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर विरोधक, नेटीझन्स यांनी सत्ताधारी आणि सरकारला धारेवर धरलं. यावरुन संतापलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारलं. तसेच माझी बदनाम करा, पण महाराष्ट्राची बदनामी कराल तर कोणालाही सोडणार नाही, अशा इशाराही मुख्यमंत्र्‍यांनी दिला. हीच बाब आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खटकली.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता.9 जुलै) रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मिसिंग लिंक विविध मुद्द्यांवरुन फडणवीस सरकार, मुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी विधानसभेतील मुख्यमंत्री फडणवीसांच्या खटकलेल्या भाषणाचा समाचार घेताना त्यांचा पहिल्यांदाच एकेरी उल्लेख केला.

राज ठाकरे म्हणाले, स्वत:च्या अंगाशी आल्यावर ते राजकारण. असं कसं होईल. काय म्हणतात म्हणे, एकवेळ मला बोला. पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोकं त्या मिसिंग लिंकवर बोलतायत. महाराष्ट्राचा कुठे अपमान होतोय अशा शब्दांत त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत फडणवीसांवर निशाणा साधला.

मनसे अध्यक्षांनी केंद्र सरकारची सवय लागली आहे. केंद्राच्या कोणत्या गोष्टीबद्दल बोललं, तर तुम्ही देशद्रोही” असा आरोपही यावेळी फडणवीस सरकारवर केला. तसेच मिसिंग लिंकवरुन मुख्यमंत्री विधानसभेत बोलतात बघून घेईन, अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना तू अशा एकेरी भाषेतच राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचा समाचार घेतला.

Raj Thackeray & Devendra Fadnavis
Maharashtra Shaktipeeth Project: 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी आता थेट विठ्ठलालाच घालणार साकडं, 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची निघणार 'दिंडी'

राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या भाषणात मिसिंग लिंकबद्दल बोललं, तर त्यात कुठे आला महाराष्ट्राचा अपमान. लोकांनी प्रश्न विचारायचे नाही का ? अशी संतप्त विचारणाही केली. इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय. दामदुपटीने यांच्या अंगलट आलं. आता त्रास होतोय. तुम्हीच सुरू केल्या या गोष्टी. 10-12 वर्षात तुम्हीच सुरू केलं. वाईट साईट बोलणं, घाण बोलणं तुमच्या टीमने केल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

मनसे प्रमुखांनी यावेळी फडणवीसांच्या 'राजकारण करू नका' या सभागृहातील वक्तव्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, वा रे वा, त्याचं राजकारण करू नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण? आपण इतकी वर्षे विरोधात असताना काय करत होतात, दुसऱ्यांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? आता स्वतःच्या अंगाशी आल्यावर विरोधक राजकारण करतात, असे तुम्ही बोलताय असा टोलाही त्यांनी लगावला.

Raj Thackeray & Devendra Fadnavis
Vedant Bandgar case : लेकाच्या खुनातील तो संशयित निष्पाप! वेदांत बंडगरच्या वडिलांनीच पोलिसांकडे दया दाखविण्याची विनंती केल्याने खळबळ

राज ठाकरे म्हणाले, भाजपचे लोक म्हणतात, नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात राजकारण आणू नका. लक्षात ठेवा. तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. उद्या कुणी असं केलं तर नैसर्गिक गोष्ट आहे असंच सांगा. लोकांना सांगा. झाड पडून मुलगा जातो. माणूस जातो. मुलगा गटारात पडतो. म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक? तुमचं सरकार असल्यावर नैसर्गिक. इतरांचं असल्यावर राजकारण करणार अशी टीकेची झोडही त्यांनी यावेळी उठवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com