जिथून पळाले तिथंच पुन्हा अवतरले संदीप देशपांडे; ठाकरे सरकारला दिलं थेट आव्हान

मनसेचे संदीप देशपांडे अन् संतोष धुरी हे शिवतीर्थाबाहेरून पळाले होते.
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या दोघांना सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की करून शिवतीर्थाबाहेरुन पलायन केले होते. यानंतर दोघेही गायब झाले होते. अखेर जामीन मिळाल्यानंतर संदीपर देशपांडे जिथून पळाले तिथंच आज पुन्हा अवतरले. त्यांनी जाहीरपणे राज्य सरकारला आव्हान दिलं आहे. (MNS Sandeep Deshpande Latest News Updates)

शिवतीर्थाबाहेर पत्रकार परिषदेत बोलताना देशपांडे म्हणाले की, आम्ही सरकारविरोधी बोलू नये, आमची थोबाडं बंद राहावीत यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. माध्यमांनी दाखवलेल्या फुटेजवरून आम्ही कसलाही गुन्हा केला नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. मी जर धक्का लावल्याचं तुम्ही दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन. शिवसेना आणि राज्य सरकार सुडाचे राजकारण करीत आहेत. मी घरी नसताना माझी मुलं आणि बायको घरी असताना तुम्ही पोलीस पाठवता. हे तुम्हाला पटतं का? आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचेही दिवस येतील.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरुन पोलीस देशपांडे यांना ताब्यात घेणार होते. त्यावेळी पोलिसांच्या ताब्यातून ते निसटले. पण पळून जाताना पोलिसांशी झालेल्या झटापतीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली होती. यावरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र देशपांडे यांनी निर्दोष असल्याचा दावा केला होता.

Sandeep Deshpande
भाजपचा दे धक्का! काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांनाच फोडलं

मागील सुनावणीवेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी देशपांडे आणि धुरी यांचा पळून जाण्याचा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयापुढे सांगितला होता. घरत म्हणाले होते की, संतोष साळी, संदीप देशपांडे, संतोष धुरी राज ठाकरे यांच्या घरात गेले. बाहेर आल्यानंतर प्रतिबंधक कारवाई असून, ताब्यात घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली. त्यावर पत्रकारांशी बोलून येतो, असे दोघांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद झाल्यानंतर ते हळूहळू चालत त्यांच्या गाडीजवळ गेले. त्यावेळी पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता दोघेही चालत्या गाडीत बसून पळून गेले.

Sandeep Deshpande
काँग्रेसचा नेता हत्तीवर बसून फिरत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला अन्...

चालकाने गाडीही वेगात दामटवत नेली. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडा आहे हे देखील पाहिले नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी झालेल्या पळापळीत महिला पोलीसही जखमी झाल्या आहेत. संतोष धुरी यांना ताब्यात घेताना चालकाने गाडी चालवली. या वेळी गाडीचे एक चाक पोलीस अधिकाऱ्याच्या पायावरून गेले. त्यामुळे अधिकाऱ्यांची पकडही सैल झाली. तसेच धावत्या गाडीचा उघडा दरवाजा महिला पोलीस कर्मचाऱ्याला लागला आणि त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या पाठीला दुखापत झाली. पुढे काही अंतरावर आरोपींनी गाडी बदलून ते नवी मुंबईच्या दिशेने गेले, असे घरत यांनी सत्र न्यायालयात सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com