MNS News : 'निरुपम, वायकरांसारख्या उमेदवारांसाठी मनसेचा पाठिंबा...!'; महिला नेत्याच्या ट्विटने महायुतीत खळबळ

Loksabha Election News : संजय निरुपम यांच्या पाठोपाठ आता काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या रवींद्र वायकरांच्या उमेदवारीलाही मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे.
Eknath Shinde, Raj Thackeray
Eknath Shinde, Raj ThackeraySarkarnama

Mumbai News : दोन पिढ्यांपासून काँग्रेससोबत असलेल्या नेत्यांनीच बड्या नेत्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला. यानंतरही काँग्रेसला धक्क्यावर धक्के सुरू आहेत. संजय निरुपम आणि राजू वाघमारे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसची राज्यात चांगलीच पडझड झाली आहे. निरुपम हे शिंदे गटात प्रवेश करत असून, त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

पण आता लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. संजय निरुपम यांच्या पाठोपाठ आता काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या रवींद्र वायकरांच्या उमेदवारीलाही मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे.

Eknath Shinde, Raj Thackeray
Lok Sabha Election 2024 : 'सत्ताधाऱ्यांकडून 'वंचित'च्या उमेदवारांना धमक्या'; प्रवक्ते मोकळे यांचे खळबळजनक आरोप!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यात संजय निरुपम यांच्यासह रवींद्र वायकरांच्या नावांची चर्चा आहे. वायकरांचा पक्षप्रवेश हा लोकसभा उमेदवारीसाठीच असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मनसेनं वायकरांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विटद्वारे वायकरांना उमेदवारी देण्यावरून आक्षेप घेतला आहे.

मनसे नेत्या शालिनी ठाकरे Shalini Thackeray यांनी ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये निरुपम यांचा महाराष्ट्रद्रोही तर रवींद्र वायकर यांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केला आहे. त्या म्हणाल्या, ‘मनसेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे.

ठाकरे म्हणाल्या, इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेल्या महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकरांसारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहीत धरू नये, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या ट्विटमुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यापूर्वी निरुपमांना विरोध...

मनसे नेते मनीष धुरी यांनी या अगोदर संजय निरुपम Sanjay Nirupam यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘निरुपम हे नेहमी मराठी माणसांविरोधात होते, मराठी मुलांच्या हक्कासाठी जेव्हा-जेव्हा आंदोलन झाले तेव्हा-तेव्हा ते आडवे आले. आम्ही त्यांचा विरोध करतो, त्यांना त्यांची जागा दाखवू’ असं धुरी यांनी म्हटलं आहे. ‘दरम्यान निरुपम यांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे मनसे कार्यकर्त्यांवर आणि मराठी मुलांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्यांना तडीपार करण्यात आले’ ,असा आरोपही या वेळी धुरी यांनी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Eknath Shinde, Raj Thackeray
Lok Sabha Election 2024 : 'सत्ताधाऱ्यांकडून 'वंचित'च्या उमेदवारांना धमक्या'; प्रवक्ते मोकळे यांचे खळबळजनक आरोप!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com