मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच मनसेतूनही (MNS) त्याला विरोध होत असून गुरूवारी राज्यभरातील 35 पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला. त्याआधीही काही कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यानंतर आता मनसेने कार्यकर्त्यांना पक्षाचे पुण्यातील नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) आणि नाशिक येथील सलीम शेख (Salim Shaikh) यांचं उदाहरण दिलं आहे.
'मनसे वृत्तांत अधिकृत' या मनसेच्या फेसबूक पेजवरून बाबर आणि शेख यांचं कौतूक करण्यात आलं आहे. 'राजसाहेबांचे हे दोन महाराष्ट्र सैनिक आहेत राजकीय परिपक्वतेचे उत्तम उदाहरण', अशी सुरूवात करत त्यांची वैशिष्ट्ये अधोरेखित केली आहेत. साईनाथ बाबर हे जवळपास ६० ते ७० टक्के मुस्लिम मतदारांमधून निवडून आलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रतिनिधी आहे, असं म्हटलं आहे.
सलिम मामा शेख हे जवळपास ८५ ते ९५ टक्के हिंदू मतदारांमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी मशिदीवरील भोंग्याबाबतीत घेतलेल्या भुमिकेमुळे दोघेही भविष्यातील कोणत्याही राजकीय परिणामाची पर्वा न करता आजही राजसाहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभे. न्यायालयाने भोंग्यावर दिलेल्या निर्णयानुसार राजसाहेबांनी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन किंबहुना कोणतीही पक्ष विरोधात भूमिका न घेता दोघेही अजूनही आपापल्या विभागातील जनतेच्या मनात घर करून कायम असल्याचे फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. राजकीय परिपक्वता' असावी तर अशी, असं पोस्टच्या शेवटी नमूद केलं आहे.
35 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
पुण्यातील मनसे शाखा अध्यक्ष माजीद शेख, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी, शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राजीनामा सत्र हे राज्यभर सुरु झाले असल्याचे चित्र आहे. मुंबई, मराठवाडा येथील मनसेतील सुमारे ३५ नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेचे सरचिटणीस फिरोज खान यांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करीत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख (Irfan Shaikh) यांनी काल (गुरुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला.
''खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा 'जय महाराष्ट्र' म्हणण्याची वेळ आली आहे,'' असे शेख यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.