

MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुनहा एकदा कात टाकत असल्याचं राज ठाकरेंच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हालचालींवरुन दिसतं आहे. मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी जनतेसाठी एक वेबसाईट सुरु केली असून महाराष्ट्र नेक्स्ट असं या वेबसाईटचं नाव आहे. यावर लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. विकासाची ब्लू प्रिंटच्या प्रयोगानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नेक्स्टचा हा दुसरा प्रयोग केला आहे.
त्याचबरोबर आता या आपल्या नव्या मोहिमेला आणखी पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनी मनसेच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आजच्या मनसेच्या बैठकीत याची घोषणा करण्यात आली. पक्ष बांधणी आणि संघटनेच्या विस्तारासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत जिल्हास्तरावरील संपर्क अध्यक्षांच्या नेमणूका करण्यात आल्या, यामध्ये कुठल्या नेत्यावर कुठली जबाबदारी सोपवण्यात आली आहे, हे सविस्तर जाणून घेऊयात.
बाळा नांदगावकर, बंटी मार्शलकर - संभाजीनगर
संदीप देशपांडे - रायगड
यशवंत किल्लेदार - कोल्हापूर
अविनाश जाधव - नाशिक
हेमंत प्रभु - नागपूर
नितीन सरदेसाई - रत्नागिरी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.