पुणे : नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना टोमणा लगावला आहे. देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी टि्वट करीत राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
''उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर "सामना कार"रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना. "झुकेगा नहीं साला",'' असे टि्वट करीत संदीप देशपांडेंनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे.
पाच राज्यांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजपचे नेते मोहित कम्बोज (Mohit Kamboj Bharatiya)यांनीहीसंजय राऊत यांना डिवचलं होतं. त्यांनी एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे, संजय राऊत 'हाऊ इज द जोश'
पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले होते की, आम्ही लढलो, ही लढाई चालू राहिल. विजय पराजय अंतिम नसतो, शिवसेनेच्या बाबतीत ही सुरुवात आहे, भविष्यात न थांबता आम्ही काम करत राहू. भाजपनं विजय पचवायला शिकले पाहिजे, सुडानं काम न करता चांगलं काम करावं, अशी अपेक्षा मी करतो, उत्तर प्रदेशात जर चांगल्या प्रकारे विरोधकांना एकत्र आणता आलं नाही. भविष्यात विरोधी पक्ष काम करताना नियोजनपूर्वक विचार करु, काँग्रेसला स्वत:च्या भूमिकेत बदल करावा लागेल.
'' उत्तर प्रदेशात मोठा असंतोष होता, मात्र फायदा घेता आला नाही,'' असे राऊत म्हणाले. भाजपने उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) बहुमताचा आकडा पार केला आहे. यासह मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यातही भाजप सरकार स्थापन करेल, अशी परिस्थिती आहे.
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेनं 60 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याठिकाणी जाऊन प्रचार केला होता. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना उमेदवारांना 0.02 टक्के म्हणजे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. नोटा पर्यायाला 0.71 टक्के मतं पडली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.