राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आक्रमक : भोंगे लावण्याचा प्लॅन बी ठरला..

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांचा इशारा
Avinash Jadhav
Avinash Jadhavsarkarnama
Published on
Updated on

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंब्र्यातील मशिदिवरील भोंगे पोलिसांनी उतरवले नाही आणि अनधिकृतपणे सकाळची बांग सुरु झाली, तर मनसेचे कार्यकर्ते मुंब्र्यात धडकणार, असल्याचा इशारा मनसेचे ठाणे-पालघर (Thane) जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिला आहे.

जाधव म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पालन न करता मुंब्र्यातील मशिदिवरील भोंगा वाजला तर सकाळी ५ वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्यात येईल. लाऊडस्पीकर हा विषय धार्मिक नसुन सामाजिक आहे. सामाजिक समस्या म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे, बऱ्याच वर्षांपासून हा विषय सुटता सूटत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन आम्ही नक्की करणार, असल्याचे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

Avinash Jadhav
Imtiaz Jalil : मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून पोलिसांनी राज ठाकरेंवर सोपी कलमं लावली ?

मशिदीवरील भोंगे पोलिसांनी काढले नाही तर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला, असल्याने ठाणे जिल्ह्यात हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केला आहे. तसेच, भोंगा उतरवला नाही तर मुंब्रा येथील मशिदी बाहेर संघर्ष करणार, असल्याचेही जाधव यांनी सांगितले. त्यामुळे ठाण्यात भोंग्यांचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Avinash Jadhav
राज ठाकरे सभा : पोलिसांनी कलमे शोधून लावली, गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्ष तुरुंगात

ईद सणामध्ये व्यत्यय नको म्हणुन राज ठाकरे यांनी ३ मे ऐवजी ४ मे पासुन भोंगे उतरलेच पाहिजेत, असा आग्रह धरला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहुन राज्य सरकारने ही कार्यवाही करणे गरजेचे आहे. तरीही नाहक या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो हे दुर्दैवी असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले. तेव्हा, भोंगे उतरले नाही तर, राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक सज्ज असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com