बापबेटे जेलमध्ये जाणार की नाही हे वेळ ठरवेल; पण सलिम-जावेद नक्की जाणार!

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आरोप केले होते.
Sanjay Raut, Mohit Kamboj
Sanjay Raut, Mohit Kambojsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आरोप केले होते. त्याच बरोबच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर मात्र, आज पुन्हा एकदा राऊत यांनी सोमय्या यांना डिवचले आहे. त्यावरुन मोहित कंबोज यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत ''बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch!कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!'' असे म्हटले होते. त्यावरुन कंबोज यांनी राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, राऊत म्हणाले बाप आणि मुलगा जेलमध्ये जाणार. बाप आणि मुलगा जेलमध्ये जाईल की नाही हे येणारी वेळ ठरवेल. पण सलिम आणि जावेद मात्र नक्की जातील. तुम्हाला तर माहीतच असेल सलिम आणि जावेद कोण ते, असा सवालही त्यांनी केला.

पण सलिम आणि जावेदमध्ये पहिले जेलमध्ये कोण जाणार यात स्पर्धा लागलीय. सलिम आणि जावेदमधील पहिला जेलमध्ये कोण जाणार आणि अनिल देशमुख यांच्यासोबत कुणाची पहिली मुलाखत होणार. आम्ही पण त्यावेळी बघणार आहोत सलिम आणि जावेदला अनिल देशमुख यांच्यासोबत जेलमध्ये जेवताना, असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांनी कसा पदांचा दुरुपयोग केला हे सर्वाना कळेल, असेही कंबोज म्हणाले आहेत.

Sanjay Raut, Mohit Kamboj
संजय राऊतांनी तासभर आरोप केले; पण फडणवीसांनी एकाच वाक्यात उत्तर दिले...

खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप

१) महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांकडून धमकी

२) सरकार पाडण्यासाठी मदत न केल्यास टाईट करण्याची धमकी

३) देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांच्या काळात महाआयटीमध्ये सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार

४)फडणविसांच्या काळातील पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे. आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार

५) राकेश वाधवान यांच्यापासून 12 हजार कोटी रुपयाची जमीन मोहित कंबोजने 100 कोटी रुपयांत खरेदी केली

६) मोहित कंबोज हा फडणवीसांचा फ्रंट मॅन, तो फडणविसांना बुडविणारा आहे

७) ईडीच्या लोकांनी 80 वर्षांच्या वृद्धाला पकडून नेले. तो रडत होता.

८) महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंड येथील सरकारे पाडण्याचे कारस्थान

९) मुंबईतील प्रतिष्ठित बिल्डरांकडून ईडीच्या नावाखाली वसुली सुरू आहे. मुंबईतील साठ बिल्डरांकडून तीनशे कोटींची वसुली.

१०)जितेंद्र चंद्रालाल नवलाणी हा कोण आहे? हे नाव ऐकून दिल्लीतील ईडीच्या लोकांना श्वास रोखेल.

११ PMC बॅंक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराचे कागद मी ईडीला पाठवले आहेत.

Sanjay Raut, Mohit Kamboj
राऊतांच्या पत्रकार परिषदेवर पटोले म्हणाले, 'आरोपांचे समर्थन, पण..'

१२) राजेंद्र लखाणी हा सोमय्या यांचा फ्रॅंटमॅन

१३) निकाॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे. PMC घोटाळ्यातील आरोपी वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी 80 ते 100 कोटी रुपयांची रोकड घेतली.

१४)निकाॅन कन्स्ट्रक्शनमार्फत दोन ठिकाणी जमीन घेतली. या कंपनीचे सर्व प्रकल्प रद्द करा, असे माझे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे.

१५)किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा.

१६) PMC बॅंक घोटाळ्यातील पैसे मी वापरत असल्याचा सोमय्या सांगतात. पण त्यातील राकेश वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत.

१७) एक दूधवाला पाच वर्षांत सात हजार कोटींचा मालक कसा झाला?

१८) माजी वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल आम्ही काही बोललो का? त्यांच्या मुलीच्या लग्नातील सेट साडेनऊ कोटी रुपयांचा होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com